मुंबई : प्रेमात वयाचे बंधन नसते, असे म्हटले जाते. तुमच्या आसपासच्या अनेक उदाहरणातून ते स्पष्टही झाले असेल, जाणवले असेल. पूर्वी पत्नीही पतीपेक्षा काही वर्षांनी लहान असावी असे पुरुषांना वाटावे. आणि तसाच सामाजिक विचारही होता. त्याला समाजमान्यता होती. पण काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या. त्यातील एक म्हणजे पुरुषांना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिला अधिक आवडू लागल्या आहेत. वयाने मोठ्या महिलांकडे आकर्षित होण्याचा पुरुषांचा वाढता कल पाहता यामागचे नेमके कारण काय असावे? असे प्रश्न सामान्यांना पडतात. तर या गोष्टींमुळे पुरुष आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलांकडे अधिक आकर्षित होतात.


जबाबदार साथीदार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक पुरुषाला आपली बायको जबाबदार असावी, असे वाटते. घराबाहेरील कामातही ती तत्पर असलेले पुरुषांना भावते. घरातील सर्व जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळणाऱ्या महिला पुरुषांना अधिक आवडतात.


आत्मविश्वास


वयाने मोठ्या असलेल्या मुलींमध्ये अनुभवातून उत्तम आत्मविश्वास आलेला असतो. तो आत्मविश्वास पुढील आयुष्यात कामी येणार असल्याची जाणीव पुरुषांना असते. एका शोधातून असे दिसून आले आहे की, उशिरा लग्न करणाऱ्या महिलांचे लग्न कमी वयात लग्न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत अधिक काळ टिकते. याच्या मागे अनुभव हेच एक कारण आहे.


स्वावलंबी


मुलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर महिला भावतात. उत्तम संसारासाठी, तिच्या आत्मसन्मानासाठी पत्नीने स्वावलंबी असणे पुरुषांना आवडते. त्याचबरोबर अशा महिलांचा खर्चही पुरुषांना उचलावा लागत नाही.


प्रामाणिक


वयाने मोठ्या महिला या नाते आणि कर्तव्यांच्या बाबतीत प्रामाणिक असतात. कारण वयानुसार आलेले शहाणपण, अनुभव यातून त्या नात्याचे महत्त्व शिकलेल्या असतात.


भावनिक आधार


वयाने मोठ्या असलेल्या महिला साथीदाराला उत्तम भावनिक आधार देऊ शकतात. याउलट वयाने कमी असलेल्या महिलांकडून या अपेक्षेची पूर्ती होणे काहीसे कठीण असते. याच कारणाने पुरुषांना वयाने मोठ्या असलेल्या महिला अधिक भावतात.


आई आणि पत्नीत सार्धम्य 


प्रत्येक पुरुषाला पत्नी ही त्याच्या आईसारखी हवी असते. जी निस्वार्थी भावनेने प्रेम करेल, काळजी घेईल. वयाने मोठ्या असलेल्या महिला पती आणि कुटुंबाची अधिक काळजी घेतात.