Budget 2024: कॅन्सरच्या `या` 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?
Budget 2024: अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, औषधांच्या सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जाणार आहेत.
Budget 2024: मोदी सरकार 3.0 चं पहिलं बजेट आज लोकसभेट सादर केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी आरोग्य विभागासाठी मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प 2024 वर भाषण करताना कॅन्सर रुग्णांसाठी बजेटमध्ये अनेक विशेष गोष्टी आहेत. कॅन्सरच्या तीन औषधांवर कस्टम ड्युटी मोफत असल्याची घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे कॅन्सरच्या औषधांच्या किमती कमी होणार आहेत.
औषधांच्या किमती 15 टक्क्यांनी कमी
अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, औषधांच्या सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जाणार आहेत. याशिवाय मोबाईल फोन आणि त्यांच्या पार्ट्सवरील बीसीडी (बेसिक कस्टम ड्यूटी) 15% पर्यंत कमी केली जाणार आहे.
कॅन्सरच्या औषधांच्या किमतीत होणार घट
दरम्यान बजेटमध्ये कॅन्सरच्या रूग्णांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्यण घेण्यात आला आहे. हा निर्णय कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता कॅन्सरसारख्या आजारावर महागड्या औषधांवर जास्त पैसा खर्च करण्याची गरज भासणार नाही.
आरोग्यमंत्र्यांनी टप्प्याटप्प्याने उत्पादन कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय क्ष-किरण यंत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनेल डिटेक्टरवरील बेसिक कस्टम ड्युटी (BCD) मध्ये सुधारणांच्या फ्रेमवर्कमध्ये बदल केले जाणार आहे. जेणेकरून देशांतर्गत उत्पादनाची क्षमता वाढवता येणाार आहे.
अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, 'कॅन्सर रुग्णांना दिलासा देण्यासाठी तीन औषधांना पूर्णपणे सूट देण्याचा प्रस्ताव आहे. वैद्यकीय एक्स-रे मशीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनेल डिटेक्टरवरील बीसीडीमध्येही बदल प्रस्तावित आहेत.
मुंबईच्या एका खाजगी रूग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी (सीएओ) रेनी वर्गीस यांच्या सांगण्यानुसार, कर्करोगावर उपचार करण्यासाठी असणाऱ्या टैस्टुजुमैंब डेरक्सटेकन, ओसिमर्टिनिब और ड्यूरवमैव या तीन औषधांना कस्टम ड्युटीमधून सूट दिल्याने कर्करोगाच्या रुग्णांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर कर्करोग उपचारावरील आर्थिक भार आता कमी होण्यात मदत मिळेल. कारण कर्करोग रूग्णांना उपचार सुरू असताना शारीरिक त्रासासह उपचारासाठी लागणाऱ्या पैशांची समस्या असते. बऱ्याचा कर्करोगावरून उपचारांचा खर्च पाहून रूग्ण उपचार करून घेण्यास टाळाटाळ करतात. परंतु, सरकारने कर्करूग्णांचा विचार करून कस्टम ड्यूटीत सूट दिल्याने रूग्णांना याचा फायदा होणार आहे.
वर्गीस पुढे सांगतात की, सरकारने जीवरक्षक औषधांवर कस्टम ड्युटीमध्ये सूट दिल्याने जीव वाचतील, रुग्णांपर्यंत जलद पोहोचेल आणि त्यांना परवडणारे असेल. रुग्णसेवा सुधारण्यासाठी सरकारने घेतलेला हा एक उत्तम निर्णय आहे. देशाच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित करतो. याच्या समांतर, क्ष-किरण ट्यूब आणि फ्लॅट पॅनेल डिटेक्टरवर मूलभूत सीमा शुल्क (BCD) समायोजित करणे एक गेम-चेंजर पाऊल असेल आणि वैद्यकीय सुविधांमध्ये निदान क्षमतांमध्ये क्रांती घडवून आणेल. स्थानिक उत्पादकांना आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे उच्च-गुणवत्तेची इमेजिंग उपकरणे नवनवीन आणि उत्पादनासाठी प्रेरित करेल. अर्थसंकल्पातील या उपक्रमांचा तीव्र परिणाम वेळेवर निदान करून आणि आरोग्य सेवा व्यवस्थेवरील भार कमी करून रुग्णांचे परिणाम सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
एका कॅन्सर रूग्णालयाचे संस्थापक आणि अध्यक्ष उदय देशमुख म्हणाले की, ट्रास्टुझुमॅब डेरक्सटेकन, ओसिमरटिनिब आणि दुर्वालुमॅब या तीन कॅन्सर उपचार औषधांना मूलभूत शुल्कातून सूट देणं हा सरकारचा एक उत्तम उपक्रम आहे. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी झपाट्याने वाढ होत असताना, परवडणाऱ्या आरोग्य सेवांच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आशा आहे की, नजीकच्या भविष्यात, रुग्णाच्या फायद्यासाठी सरकार बहुतेक कर्करोगाच्या औषधांवर कस्टम ड्युटी सवलत प्रदान करण्यास सक्षम असेल. सरकारने सार्वजनिक हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आम्ही आनंदी आणि समाधानी आहोत.