winter care: हिवाळ्यात सर्वात जास्त नुकसान त्वचेचं होतं, बाहेर हवेत वेगळ्या प्रकारची आद्रता असते, त्यामुळे हवा कोरडी असते अश्या  आल्याने आपली त्वचा रुशक होऊन काळवंडते आणि फारच ड्राय दिसू लागते. अश्या वेळी आपण मॉईशरायझर (moisturiser) लावून त्वचेला हील करण्याचं काम करतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्किन रुटीनमध्ये  (skin routine) नाईट क्रीम लावायला सुद्धा सांगितलं जात, पण नाईट क्रीम ज्या आपण बाजारातून घेतो त्या एकत्र महाग असतात किंवा केमिकलयुक्त असतात,


आणि त्या आपल्या स्किनसाठी योग्य असतीलच असं नाही बऱ्याचदा आपल्याला त्याचा त्रास होतो.


त्यामुळे घरच्याघरी काही सोप्या गोष्टी वापरून आपण नाईट क्रीम्स बनवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कश्या प्रकारे बनवलं नाईट क्रीम घरच्या घरी... 


ही DIY नाईट क्रीम बनवण्यासाठी काही गोष्टींची तुम्हाला गरज लागणार आहे, आणि या गोष्टी सहज आपल्या घरात उपलब्ध असतात. 


* बदाम (almond)


* गुलाबपाणी (rose water)


* बदामाचे तेल (almond oil)


* कोरफड जेल (aloe vera)


* व्हिटॅमिन ई कॅप्सूल (vitamin e capsule)


कृती  (method)
सर्वप्रथम 10 ते 12 बदाम घ्या, ते रात्रभर भिजवून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची साल काढून घ्या त्यात एक टेबलस्पून गुलाब पाणी घाला आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या,आता हे मिश्रण व्यवस्थित गाळून घ्या,  त्यात २ चमचे बदाम तेल, २ चमचे कोरफड जेल घाला  यात  ई कॅप्सूलचे तेल मिसळा. सगळं विश्राम एकजीव करून घ्या आणि फ्रिजमध्ये ठेऊन द्या. 


हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा. मात्र त्या आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या, जर फेस मिस्ट (face mists) असेल तर तेसुद्धा वापर करा आणि मग चेहऱ्यावर नाईट क्रीम (night cream) अप्लाय करा. 


ज्यांची त्वचा कोरडी आहे अश्यांसाठी बदाम उत्तम उपाय आहे, याने त्वचेवरील पुरळ दूर होतात लालसरपणा कमी होतो. आणि अगदी गुळगुळीत त्वचा मिळण्यास मदत होते.


 तर मग या हिवाळ्यात नाईट क्रीम लावा आणि आपल्या त्वचेला आणखी सुंदर बनवा. 


(टीप : वरील माहिती माहितीच्या आधारावर दिलेली आहे झी २४ तास याची खातरजमा करत नाही )