Women's Health : महिलांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी. महिलांनो (Womens) आरोग्य सांभाळा असं सांगायची वेळ आली आहे. कारण मुंबईतल्या 63 टक्के महिलांची हाडं (Bones) कमकुवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 40 वर्षांपेक्षा जास्त महिलांमध्ये पाचपैकी तीन महिला ऑस्टियोपेनियाने (Osteopenia) ग्रस्त आहेत. तर चौघींपैकी एकीला ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis)असल्याचं निदान झालंय. या दोन्ही आजारांत हाडांची घनता कमी होते. फ्रॅक्चर, तीव्र वेदना होणं आणि हालचाली कमी होण्याचा धोका महिलांमध्ये वाढू शकतो. ऑस्टिओपोरोसिसमुळे मणक्याच्या फ्रॅक्चरचा (Spine Fracture) धोका वाढतो तसंच श्वासोच्छ्वासावरही परिणाम होऊ शकतो..  यात हाडं कमकुवत आणि ठिसूळ होतात, त्यामुळे ती तुटण्याची शक्यता वाढते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय? 
ऑस्टिओपोरोसिसमध्ये महिलांची हाडं कमकुवत आणि ठिसूळ होऊन तुटण्याची शक्यता असते. महिलांमध्ये मणक्याच्या फ्रॅक्चरचा धोका वाढतो. धक्कादायक म्हणजे मुंबईत 4 पैकी एका महिलेला ऑस्टिओपोरोसिस ग्रस्त आहेत. ऑस्टियोपोरोसिस हा आजार  प्रामुख्याने स्त्रीयांना मेनोपॉजनंतर (Menopause) आणि वयाची साठी उलटून गेलेल्या पुरूषांमध्ये दिसून येतो. ऑस्टियोपोरोसिसचा सर्वात जास्त परिणाम पाठीचा कणा, खुबा आणि मनगटाची हाडे यांवर होतो.


ऑस्टियोपोरोसिस कसा ओळखावा
ऑस्टियोपोरोसिस ओळखण्यासाठी काही चाचण्या असतात. बोन डेन्सिटोमेट्रो चाचणी (Bone Densitometer Test), सिरम कॅल्शियम (Serum Calcium), व्हिटॅमिन डी (Vitamin D), तसंच टी 3, टी 4 टीएस, एच इस्ट्रोजन (H Estrogen), टेस्टोटेरॉन (Testosterone) यांसारख्या काही रक्तचाचण्यांनंतर या आजाराचं निदान आलं. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर किंवा साधारणपणे वयाच्या पंचेचाळीशी नंतर आणि पुरुषांमध्ये 60 वयानंतर दर पाच वर्षांनी ही चाचणी घेणं आवश्यक आहे.


ऑस्टियोपेनिया म्हणजे काय?  
ऑस्टियोपेनियामध्ये हाडांच्या कमकुवतपणाचा सौम्य प्रकार. उपचार न केल्यास ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते. मुंबईत पाचपैकी तीन महिलांना ऑस्टियोपेनियाने ग्रासलं आहे. 


हे ही वाचा : मुस्लीम देशातील मशिदीवरचे भोंगे बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय, सौदीनं केलं, भारतात कधी?


 


य उपाय कराल? 
महिलांनी जास्तीत जास्त कॅल्शियम (Calcium) आणि व्हिटॅमिन D (Vitamin D) युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. वेळोवेळी शरीरातील कॅल्शियम तपासत राहा, याशिवाय कॅल्शियम मिळण्यासाठी सकाळी उन्हात जा, वजन नियंत्रित ठेवल्यानं पाठदुखीवर आराम मिळेल. तसंच नियमित योगासन आणि व्यायाम करावा. दररोज मान आणि कंबरेचा व्यायाम करा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किमान तीन ते चार किलोमीटर पायी चाला. कॅल्शियम बरोबरच आहारात प्रोटीनचा समावेश तितकाच महत्वाचा आहे कारण प्रोटीनच्या कमतेरमुळे हाडे ठिसूळ होतात.