Ban Laoudspeakers in Mosques : मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांचा (Laoudspeakers) विषय हा महाराष्ट्रात आणि देशात कायम वादात असतो. मनसेनं (MNS) या भोंग्यांविरोधात जोरदार आंदोलन केल्यानंतर राज्यातही हा मुद्दा गाजला होता. भारतात आणि महाराष्ट्रात मशिदींवरच्या भोंग्यांमुळे सतत वाद होत असताना मुस्लिम देश असणाऱ्या सौदीनं मशिदीवरच्या (Mosques) लाऊडस्पीकरबाबत ऐतिहासिक निर्णय घेतलाय. सौदी अरेबियानं नमाज पठणावेळी लाऊडस्पीकरवर बंदी आणलीय. विशेष म्हणजे मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान (Ramdan) महिन्यापासूनच या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्यात. (Mosque Loudspeaker Banned)
सौदी अरेबियात मशिदीत भोंगाबंदी
नमाज पठणाला लाऊडस्पीकर वापरता येणार नाही. तसंच रमजानसाठी दावत मशिदीच्या आत नको, मशिदीत लहान मुलांना नमाज पठण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. इतकंच काय तर दावतसाठी वर्गणी मागण्याला रोक लावण्यात आली आहे. सौदी अरब सरकारने याबाबत 10 मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
शरिया नियम लागू झाल्यानंतर शेख मोहम्मद बिन सालेह अल-उथैमीन आणि सालेह बिन फवजान अल-फवजना यांच्या इस्मामिक धर्मगुरंनीही या नियमांचं समर्थ करत फतवा जारी केला आहे. अजानवेळी मशिदीत लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मशिदीच्या आसपास असलेल्या घरांमधील रुग्ण, वृद्ध आणि लहान मुलांना मोठ्या आवाजाचा त्रास होतो, असं त्यांनी सांगितलंय. अजानचा आवाज मशिदीच्या आतच सीमित राहिला हवा असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान सौदी अरेबियाच्या या निर्णयावर भारतातील काही इमामांनी नाराजी व्यक्त केलीय.
सौदी अरेबियात शरिया कायदा लागू आहे. मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणारी मक्का आणि मदिना ही शहरंही सौदी अरेबियातच आहेत. त्याच सौदी अरेबियात मशिदीवरील भोंगे बंद करण्यात येतायत. जे सौदी अरेबियासारख्या कट्टर इस्लामिक देशात होऊ शकतं.. ते भारतात कधी होणार अशी चर्चा यानिमित्तानं पुन्हा सुरु झालीय..