Heart Attack : शाळेत राष्ट्रगीत सुरु असतानाच अचानक दहावीच्या विद्यार्थ्यानीला मृत्यूने गाठलं आहे. कर्नाटकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे शाळेत एक च खळबळ उडाली.  हृदयविकाराचा झटका आल्याने या विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शालेय विद्यार्थीनीचा  हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट येथील एका शाळेत ही विचित्र घटना घडली आहे. पोलिशा असं मृत्य विद्यार्थीनीचे नाव आहे. सकाळी सात वाजता शाळा भरल्यानंतर शाळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन केले जाते. पोलिशा देखील नेहमीप्रमाणे इतर विद्यार्थ्यांसह रांगते उभ राहून राष्ट्रगीत म्हणत होती. यावेळी अचानक तिची प्रकृती बिघडली. तिला अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच ती जमीनीवर कोसळली.


डॉक्टरांनी मृत घोषीत केले


पोलिशा बेशुद्ध झाली. शाळेतील शिक्षकांनी तिला तात्काळ रुग्णालायात दाखल केले. डॉक्टरांनी तिची तपासणी करुन तिला मृत घोषीत केले.  पोलिशा ही अनाथ होती. शाळेच्या वसतीगृहातच ती राहत होती. तिच्या मृत्यूमुळे तिचे मित्र मैत्रीणी तसेच शाळेतील शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. 


विद्यार्थीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी


हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी सांगितले. मात्र, तरी देखील विद्यार्थीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी शाळेतील काही शित्रकांनी केली आहे. 


डान्स करताना हृदयविकाराचा झटका 


वाराणसीमधील लग्न समारंभात तरुणाला डान्स करताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तरुण काही लोकांसोबत डान्स करत असल्याचे दिसून येतोय. मग अचानक तो अडखळतो आणि जमिनीवर पडतो. बेशुद्ध अवस्थेत कुटुंबीय त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.


लहान मुलांना  हृदयविकाराचा धोका वाढला


वृद्ध आणि तरूणांना हृदयविकाराचा झटक्या येण्याचे प्रमाण अधित असते. मात्र, आता लहान मुलांना देखील हृदयविकाराचा धोका वाढला आहे.  काही मुलांना जन्मापासूनच हृदयविकाराचा धोका असतो. मात्र, बऱ्याचदा वेळीच हे लक्षात येत नाही. शारिरीक हालचाली. खाण्यापिण्याच्या सवयी अभ्यासाचा ताण तसेच विविध कारणांमुळे शालेय विद्यार्थ्यांना मानसिक तणाव येत आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा विद्यार्थ्याच्या आरोग्यावर परिणाम होत असून यामुळे  लहान मुलांना  हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचे तज्ञांचे मत आहे.