मुंबई : देशातील पहिली कॉर्पोरेट ट्रेन लखनऊ-दिल्ली तेजस एक्सप्रेस काही कारणांमुळे चर्चेत आहे. आता तेजस एक्सप्रेसवर कार्यरत असलेल्या 20 क्रू मेंबर्सला नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय. यामध्ये 11 महिला आणि 9 पुरूषांचा समावेश आहे. ट्रेन सुरू होऊन अवघे 2 महिने झाले असताना ट्रेन वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या 20 क्रू मेंबर्सना 4 नोव्हेंबर रोजी काढून टाकण्यात आलं आहे. हे क्रू मेंबर्स कॉन्ट्रॅक्टवर काम करत असून त्यांना महिन्याला भत्ता दिला जात असे. नोकरीवरून काढून टाकलेल्यां म्हणणं असं आहे की, त्यांनी अन्याया विरूद्ध आवाज उठवल्यामुळे कामावरून काढून टाकलं आहे. 


या क्रू मेंबर्सकडून जबरदस्ती 18 तास काम करून घेतलं जात असे. तसेच ठरवल्यापेक्षा कमी पगार दिला जात होता. तसेच महिला क्रू मेंबर्सने सांगितल्याप्रमाणे, प्रवासी त्यांना सेल्फी घेण्याच्या कारणाने त्रास देत असतं. अनेकदा याची तक्रार करूनही कोणती कारवाई करण्यात आली नाही. 


आयआरसीटीसीने तेजस एक्सप्रेसच्या वृंदावन फूड प्रॉडक्टसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो संपर्क होऊ शकला नाही. आयआरसीटीसीने वृंदावन फूड प्रॉडक्टसला याबाबत जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच आयआरसीटीसीचे प्रमुख प्रादेशिक व्यवस्थापक अश्विनी श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी आपल्याला कोणत्याही महिलेची तक्रार आली नसल्याच सांगितलं आहे. 


तेजस एक्सप्रेसमध्ये विमान प्रवासाप्रमाणे सुखसोई देण्याकरता महिला अटेंडेट म्हणजे महिला कर्मचारी ठेवण्यात आल्या आहे. तेजस एक्सप्रेसवर जवळपास 45 महिला कर्मचारी कार्यरत आहेत. अनेकदा सेल्फी काढण्याच्या हेतूने महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार समोर यायचे.