नवी दिल्ली : नितीश कुमार आणि भाजपचे सुशील मोदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्याआधी आता जेडीयूमधून नाराजीचा सूर बाहेर पडू लागला आहे. भाजपसोबत युती करण्याच्या निर्णयाचं समर्थन करत नाही, असं आज जेडीयूचे खासदार अली अन्वर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता जेडीयूमध्ये दोन गट पडल्याचं उघड होतं आहे.


चारवर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यावर आज नितीश कुमारांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सरकार स्थापन केलं. रात्री उशिरा सत्तास्थापनेचा दावा करून बिहारमध्ये आज सकाळी एनडीएची सत्ता आली. आता उद्या नितीशकुमारांचं नवं सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करले. सरकारला १३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा सुशील मोदींनी आधीच केलेला आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक १२२चं संख्याबळ नितीशकुमारांच्या सरकारकडे आहे हे निश्चित आहे.