मारूतीची नवी इग्निस, कंपनीने केलेयत हे बदल
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूती सुझुकीने (Maruti Suzuki) हॅचबॅक कार इग्निस (Ignis) नव्या रुपात आणसी आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूती सुझुकीने (Maruti Suzuki) हॅचबॅक कार इग्निस (Ignis) नव्या रुपात आणसी आहे. इग्निसच्या नव्या मॉडेलच्या विक्री आधी सारखीच मारूती नेक्सा प्रिमीयमच्या डीलरशीपच्या माध्यमातून केली जाणार आहे. कारच्या सुरूवातीची एक्स शोरूम किंमत 4.79 लाख रुपये आहे. नव्या कारच्या स्टाईलमध्ये कंपनीने कोणताही बदल केला नाही. लुक पाहता 2017 मध्ये लॉंच केलेल्या इग्निस प्रमाणेच असणार आहे.
सेफ्टी फिचर्स वाढवले
नव्या इग्निसमध्ये रिवर्स पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट सिस्टीम आणि पॅसेंजर साइट सीट बेल्ट रिमाइंडर देण्यात आला आहे. एकूण पाहता या कारमध्ये नवे सेफ्टी फिचर जोडले गेले आहेत. नव्या इग्निसमध्ये रुफ रेल्स देखील देण्यात आले आहेत. इग्निस के जीटा आणि अल्फा वेरिएंटमध्ये रुफ रेल्स देण्यात आले आहेत. नव्या इग्निसच्या सध्याच्या मॉडेल प्रमाणे स्मार्टप्ले इंफोटेनमेंट सिस्टिम दिली गेली आहे. नुकत्याच लॉंच झालेल्या बलेनो आणि नव्या वेग्नार प्रमाणे स्मार्टप्ले स्टूडीओ देईल अशा चर्चेलाही आता पूर्णविराम मिळाला आहे.
1200 सीसीचे पेट्रोल इंजिन
मारूती इग्निस (Maruti Ignis) मध्ये कंपनीने मॅकेनेकली देखील कोणताही बदल केला नाही. याआधी प्रमाणेच 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारचे इंजिन 119 सीसी आहे जे 6000 आरपीएमवर 83 hp पॉवर आणि 4200 आरपीएमवर 113 एनएमचे टॉर्क जनरेट करतो. कारचे इंजिन 5 स्पीड म्यॅन्युयल आणि 5 स्पीड एएमटी दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे.
नव्या मॉडेलची किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलच्या नव्या इग्निसपेक्षा महाग असणार आहे. बेस वॅरिएंट सिग्मामध्ये कंपनीने साधारण 12 हजार रुपये आणि टॉप वॅरिएंट अल्फा ऑटोमॅटीकमध्ये साधारण 16 हजार रुपयांची वाढ केली आहे. बेस मॉडेल याआधी 4.67 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होते ते आता 4.79 पर्यंत मिळतेय. तर टॉप वेरिएंट अल्फा एमटी 6.51 लाखच्या ऐवजी 6.67 लाख रुपयांना मिळणार आहे.