चार वर्षात 3 लग्न! पत्नीला वैतागून पतीने गाठलं पोलीस स्टेशन
तिने चार वर्षात 3 लग्न केलं, एवढंच नाही तर तिने तिन्ही पतींच्या जे काही कृत्य केलं. त्याने पत्नीच्या कृत्याला वैतागून पतीने पोलीस स्टेशन गाठलं आहे.
एका लुटारु नवरीमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या तरुणीने एकापाठोपाठ तीन लग्न करत तिन्ही नवऱ्यांना लुटलं आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीमधील ही नवरी लोकांच्या डोक्याला मनस्ताप झाला आहे. या लग्नात लुटमारीचे बळी ठरलेल्या दोन नवऱ्यांनी पोलिसांचे दार ठोकलं आहे. या दोघांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लुटेरी दुल्हनच्या शोधात मोहीम हातात घेतली आहे. (3 weddings in 4 years robber bride Frustrated with his wife the husband reached the police station bareilly news)
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण बरेलीच्या इज्जतनगर पोलीस ठाण्यातील बिहारमन नागला या भागातील आहे. या ठिकाणी राहणाऱ्या इम्रानचं चार वर्षांपूर्वी भोजीपुरीमधील एका तरुणीशी ओळख झाली होती. त्यावेळी त्या तरुणीने आपण अविवाहित असल्याचं सांगितलं होतं. यानंतर इम्रान त्याच्या प्रेमात पडला आणि त्याने लग्न केलं. काही दिवसांनी महिलेने इम्रानकडे पैसे मागायला सुरुवात केली. तिची पैशांची मागणी दिवसेंदिवस वाढ होती. तब्बल दीड वर्ष तिने पैशांसाठी गोंधळ घातला. मात्र एकेदिवशी वैतागून इम्रानने पैसे देणं बंद केलं. त्यानंतर पत्नीने त्याला खोटा गुन्ह्याखाली पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली.
2021 मध्ये ही तरुणी त्याच्या घरातून 35,00 रुपये रोख आणि दागिने घेऊन दुसऱ्या तरुणासह पळून गेली होती. त्यानंतर इम्रानने पत्नीचा शोध घेण्यासाठी जमीन आभाळ एक केलं. या शोध मोहीममध्ये पत्नीचं या आधीही लग्न झाल्याचं त्याच्या कानावर पडलं. त्याने चौकशी केल्यानंतर तिचं खिजरपूर, भोजीपूरमधील सलीम नावाच्या तरुणाशी लग्न केलं होतं. हे पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
हेसुद्धा वाचा - Viral News : 18 वर्षीय मुलाच 35 वर्षीय महिलेवर जडलं प्रेम! जगाची पर्वा न करता बांधली लग्नगाठ
या संपूर्ण प्रकरणाची माहिती महिलेने इम्रानच्या नावाने खोटी तक्रार भोजीपुरा पोलीस ठाण्यात केली आहे. ती महिला आता त्याला धमकी दिली आहे, त्याने तिला पैसे दिले नाही तर ती केस मागे घेत आहे. तर दुसरीकडे सलीमदेखील बायकोचं कृत्य पाहून वैतागला आहे. या महिलेने त्यांच्याकडूनही दोन लाख रुपयांची मागणी केली आहे. इम्रान आणि सलीमने संपूर्ण प्रकार एसएसपी कार्यालयात सांगितली आहे. या दोघांनी त्या महिलेवर तीन लग्नाचा आरोप केला आहे. या महिलेने तिच्या तिसऱ्या पतीलाही लुटल्याचं म्हटलं आहे. मात्र तिसऱ्या नवऱ्याने पोलिसांकडे तक्रार केलेली नाही.