Viral News : 18 वर्षीय मुलाच 35 वर्षीय महिलेवर जडलं प्रेम! जगाची पर्वा न करता बांधली लग्नगाठ

Trending Love Story : प्रेमात वय, रंग, जात कसली मर्यादा नसते. पण एका 18 वर्षीय मुलाचा 35 वर्षीय महिलेवर प्रेम जडलं. तेवढंच नाही तर त्या मुलाने त्या महिलेशी लग्न केलं. 

नेहा चौधरी | Updated: Nov 18, 2023, 12:41 PM IST
Viral News : 18 वर्षीय मुलाच 35 वर्षीय महिलेवर जडलं प्रेम! जगाची पर्वा न करता बांधली लग्नगाठ  title=
Trending Love Story 18 year old boy fell in love with a 35 year old woman They got married VIRAL NEWS

Trending Love Story : प्रेम कधी, कुठे आणि कोणावर होईल याबद्दल आपण कोणीही काही सांगू शकतं नाही. प्रेमात वय, रंग, धर्म काही पाहिलं जातं नाही. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं असं म्हणतात. गेल्या काही महिन्यांपासून सीमापार एकमेकांशी ऑनलाइन प्रेम जुळलं आणि मग त्यांनी देशाची सीमा ओलांडत एकमेकांशी लग्न केलं. सीमा हैदरची लव्ह स्टोरी गेले काही महिने खूप ट्रेंडिंग होती. पण नुकताच सोशल मीडियावर हटके आणि आश्चर्यकारक लव्ह स्टोरी व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर या जोडीची चर्चा सुरु आहे. (Trending Love Story  18 year old boy fell in love with a 35 year old woman They got married VIRAL NEWS )

पाकिस्तानमधील ही प्रेमकहाणी जाणून प्रत्येक जण अवाक् झाले आहेत. एका 18 वर्षाच्या मुलगा 35 वर्षांच्या मुलीशी लग्न केलं आहे. शहजाद असं मुलाचं नाव असून कोमल असं महिलेचं नाव आहे. या दोघांची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. शहजाद हा शाळेत असताना कोमलच्या प्रेमात पडला होता. शाळेतील आणि त्याच्या वयात होणारं हे आकर्षण असून शकतं असं घरच्यांना वाटलं. घरच्यांनी त्याच्या प्रेमाला विरोध केला. त्या महिलेचा नाद सोडावा म्हणून शहजादला मारहाण करण्यात आली. पण तो त्या महिलेवर खरं प्रेम करतो असं म्हणत तिच्याशी लग्न करण्यावर ठाम होता. त्याच्या भूमिकेसमोर अखेर कुटुंबियांनी नमत घेतलं आणि त्यांनी लग्नाला होकार दिला. त्या दोघांच्या वयात मोठा फरक होता. 

या दोघांची प्रेम कहाणी पण विचित्र आहे. शहजाद हा कोमलसोबत राहत नाही. कारण त्याला निद्रानाशाचा त्रास होता. तर या दोघांनी एकमेकांना प्रेमाने नावंही ठेवली होती. शहजाद कोमलला पिंकी म्हणतो तर कोमल त्याला मिठू म्हणते. 

शहजाद आणि कोमलची लव्हस्टोरी व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी कमेंटचा पाऊस पडतोय. एका यूजरने लिहिलं आहे की, 'मला हा मुलगा 18 नसून 13 वर्षांचा वाटतोय.' आणखी एका युजरने लिहिलं आहे की, 'हे खरे आहे यावर माझा विश्वास बसत नाही.' पण सोशल मीडियावर या दोघांचा लव्ह स्टोरी तुफान व्हायरल होते आहे.