भारतात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिकारी...पाहा कुठल्या राज्यात काय आहे स्थिती?
भारतात भिकाऱ्यांची संख्या 4 लाखांवर आहे. मात्र सगळ्यात जास्त भिकारी जर कोणत्या राज्यात असतील, तर ते पश्चिम बंगालमध्ये आहेत.
मुंबई : भारतात भिकाऱ्यांची संख्या 4 लाखांवर आहे. मात्र सगळ्यात जास्त भिकारी जर कोणत्या राज्यात असतील, तर ते पश्चिम बंगालमध्ये आहेत.
पश्चिम बंगालमध्ये भिक मागणाऱ्या लोकांचा आकडा 81 हजार 244 इतका आहे. केंद्राचे सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गहलोत यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
2011च्या जनगणनेनुसार दिलेल्या माहितीत राज्यसभेत सांगण्यात आलं की, देशात एकूण 4 लाख 13 हजार 670 भिकारी आहेत. यातील 2 लाख 21 हजार 673 हे पुरूष तर 1 लाख 91 हजार 997 महिला आहेत.
भिकारी असण्याच्या संख्येत पश्चिम बंगाल देशात पहिलं आहे.
कोणत्या राज्यात काय आहे स्थिती?
राज्य भिकाऱ्यांची संख्या
पश्चिम बंगाल 81 हजार 244
उत्तर प्रदेश 65 हजार 835
आंध्र प्रदेश 30 हजार 218
बिहार 29 हजार 723
मध्य प्रदेश 28 हजार 685
राजस्थान 25 हजार 853
दिल्ली 2 हजार 187
चंदीगड 121
सरकारने दिलेल्या आकड्यांनुसार लक्षद्वीपमध्ये केवळ 2 भिकारी आहेत. मात्र ही सर्व आकडेवारी 2011च्या जनगणनेनुसार आहे. 10 वर्षांत ही संख्या कमी किंवा जास्त झालेली असू शकते.