नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये आपली सत्ता गमावलेल्या चंद्रबाबू नायडूंना भाजपाने मोठा धक्का दिला आहे. त्यांचे 4 राज्यसभा खासदार भाजपात आले आहेत. गुरुवारी 3 राज्यसभा खासदारांनी उपराष्ट्रपतींची भेट घेतली. आम्हाला एक वेगळा ग्रुप म्हणून मान्यता द्यावी यासाठी ही भेट होती. टीडीपीचे राज्यसभेत 6 खासदार आहेत. यातील 4 खासदारांनी वेगळा ग्रुप करत भाजपा सोबत जोडण्याची मागणी केली आहे. लोकसभेत प्रचंड बहुमताने गेलेल्या भाजपाला राज्यसभेतही बहुमताची आवश्यकता आहे. अशावेळी 4 खासदार भाजपाशी जोडले गेले तर ताकद अधिक वाढणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


टीडीपीच्या वाय.एस.चौधरी, टी.जी व्यंकटेश, सी.एम रमेश आमि जी मोहन राव यांनी उपराष्ट्रपतींची भेट घेतली. यातील 3 खासदारांनी उपराष्ट्रपतींची भेट घेतली. चौथे खासदार मोहन राव यांनी पत्राने आपले समर्थन दिले. चारही खासदारांनी राजीनामा दिला आहे. हे चार खासदार भाजपाशी जोडले गेले तर राज्यसभेत भाजपाचे संख्याबळ अधिक वाढेल.



राज्यसभेत कोणते महत्त्वाचे बील संमत करण्यासाठी याने मदत होणार आहे. देशाचा मूड स्पष्ट आहे. मोदींच्या मार्गदर्शनाखाली देशाचा विकास होतोय. आंध्र प्रदेशच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय व्हावे यासाठी भाजपमध्ये आलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी खासदार वाय.एस.चौधरी यांनी दिली.