गुवाहाटी : गेल्या १०० दिवसांमध्ये आसाममध्ये जवळपास ४० हत्तीचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. पर्यावरणवादींनी हा मुद्दा उचलून धरलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादायक म्हणजे, या हत्तींचा मृत्यू हा अनैसर्गिक पद्धतीनं झाल्याचं म्हटलं जातंय. कधी रेल्वेची धडक लागून, कधी खोल दरीत कोसळून तर कधी विषारी पदार्थ खाल्ल्यानं या हत्तींचा मृत्यू झालाय.


शहरांमध्ये हत्तींची धडक


खाण्याच्या शोधात निघालेल्या हत्तींनी आत्तापर्यंत अनेकदा शहरांमध्ये धडक दिलीय. स्थानिक लोकांना आणि त्यांच्या शेतांना यामुळे मोठी इजा पोहचलीय. त्यामुळे स्थानिकांत आणि हत्तींमधला संघर्ष अनेकदा उघड झालाय. 


आसाममध्ये सध्या जवळपास ५०० हत्ती असल्याचं आकडेवारी सांगते. यासाठी जवळपास राज्यात १०,९६७ किमी परिसर वन्य क्षेत्रात संरक्षित करण्यात आलाय. परंतु, या फॉरेस्ट रिझर्व्ह भागांना योग्य सोयी-सुविधा मिळत नाही तसंच, जंगलांचा होणारा ऱ्हास हा हत्तींच्या जीवनावर प्रश्नचिन्ह उभार करतोय, असं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे.