श्रीनगर : कुलगाममध्ये पहाटे जवानांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. लष्कराच्या जवानांनी कुलगाम जिल्ह्यातल्या खुदवानी गावाला रात्री वेढा दिला. काही दहशतवादी गावात लपल्याचा लष्कराला संशय होता. या धुमश्चक्रीत दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. त्याला तोडीसतोड उत्तर देत, जवानांनी दोघा दहशतवाद्यांचा खात्मा केला. 


मागील २ दिवसात सुरक्षारक्षकांनी ४ दहशतवाद्यांना ठार करत २ जहशतवाद्यांना जिवंत पकडलं आहे. सुरक्षारक्षकांना कुलगाम आणि शोपियामध्ये ही कारवाई केली. यानंतर पोलीस आणि लष्कराने एकत्र पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
 
काश्मीरचे आयजी मुनीर खान यांनी म्हटलं की, मागील एका आठवड्यात सुरक्षारक्षकांनी कमीतकमी ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुलगाम, शोपियामध्ये तीन सर्च ऑपरेशन झाले ज्यामध्ये ४ दहशतवाद्यांना ठाक करण्यात आलं तर २ दहशतवादी जिवंत पकडले गेले आहे.