7th Pay Commission | केंद्र सरकारचे कर्मचारी मालामाल; नवीन वर्षात सरकार देणार मोठे गिफ्ट
नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गिफ्ट घेऊन येणार आहे.
नवी दिल्ली : नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गिफ्ट घेऊन येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. 7व्या वेतन आयोगात केंद्र सरकारचे कर्मचारी 1 जुलैपासून डीएच्या टक्केवारीत वाढ करण्याची मागणी करत आहेत. आता पुन्हा एकदा महागाई भत्ता (DA) 28 वरून 31 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची अटकळ बांधली जात आहे.
47 लाख कर्मचाऱ्यांना लाभ
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि ग्रेड-पे वाढल्यावर त्यांचा पगार वाढतो, परंतु यामध्ये डीएची मोठी भूमिका असते. केंद्र सरकारच्या सुमारे 47 लाख कर्मचारी आणि सुमारे 68 लाख पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा फायदा होणार आहे.
DAत 31 टक्क्यांनी वाढ
अर्थ तज्ज्ञांच्या, सध्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18000 ते 57000 रुपयांपर्यंत आहे. त्यानुसार 18000 रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन 30,240 रुपये होणार आहे.
याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांना दरमहा 56900 रुपये पगार मिळत आहे, त्यांच्या डीएमध्ये 31 टक्के वाढ झाल्यामुळे त्यांच्या वार्षिक पगारात 211668 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच एका वर्षाच्या पगारात 95592 रुपयांचा फरक दिसेल.
अशा प्रकारे वाढणार किमान पगार
मूळ वेतन: रु. 18,000
31% DA : 5580 रुपये प्रति महिना
सध्या 17% DA : 3060 रुपये प्रति महिना
DA मध्ये वाढ: 2520 रुपये प्रति महिना
वार्षिक पगार वाढ: रु 30,240
कमाल वेतन 95,592 रुपयांनी वाढेल
मूळ वेतन: रु 56,900
31% DA : 5580 : रु 17639 प्रति महिना
सध्याचा 17% DA : रु. 9673 प्रति महिना
डीएमध्ये वाढ: रु 7966
वार्षिक पगारात वाढ: रु 95,592
HRA त वाढ शक्य
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचाऱ्यांना जानेवारी 2021 पासून वाढीव HRA मिळू शकतो. HRA उपलब्ध होताच कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे.
इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरव्हायझर्स असोसिएशन (IRTSA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ रेल्वेमेन (NFIR) यांनी 1 जानेवारी 2021 पासून HRA लागू करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर ते सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर लागू होऊ शकते.