Kanpur Murder: कानपूरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असलेले उद्योगपती राहुल गुप्ता यांची पत्नी एकताच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी एका जीम ट्रेनरला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 24 जूनची आहे. आरोपीची ओळख ग्रीन पार्क परिसरातील निवासी जीम ट्रेनवर विमल सोनी अशी झाली आहे. पोलिसांनी त्याला शनिवारी बेड्या ठोकल्याा. विमल हाय प्रोफाईल ट्रेनर आहे, जो अनेक अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देतो. 


जीम ट्रेनरचं लग्न ठरल्याने नाराज होती महिला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांना या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यानंतर पीडित महिला आरोपीचं लग्न ठरल्याने नाराज होती. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून त्याने महिलेची हत्या केली. आरोपीने महिलेचा मृतदेह कानपूरच्या जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांच्या बंगल्यातील परिसरात पुरला होता. 


डीसीपी श्रवण कुमार सिंह यांनी सांगितलं  की, "24 जून रोजी घटना घडली आहे. पीडित महिला आरोपीच्या जीममध्ये ट्रेनिंगला जात असेल. आरोपीचं लग्न ठरलं असल्यान ती कथितपणे नाराज होती. यामुळेच आरोपीशी तिचा मोठा वाद झाला होता".


त्यांनी सांगितलं की, "घटनेच्या दिवशी पीडित महिला जवळपास 20 दिवसांनी जिमला आली होती. ट्रेनर तिला कारमधून घेऊन गेला होता. कारमध्ये दोघांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी आरोपीने पीडितेच्या गळ्यावर जोरात बुक्की मारली, ज्यानंतर ती बेशुद्ध पडली".


मृतदेह पुरण्यासाठी खोदला खड्डा


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "महिला बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिची हत्या केली आणि मृतदेह पुरुन टाकला". महिलेचा मृतदेह पुरण्यासाठी त्याने एक खड्डा खोदला होता असंही पोलिसांनी सांगितलं आहे. 


आरोपीने तपासादरम्यान दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण कसून चौकशी करण्यात आली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. हत्येआधी आपण अनेकदा दृष्यम चित्रपट पाहिला होता. यामुळे न्याय दंडाधिकाऱ्यांच्या परिसरात मृतदेह पुरला असंही त्याने सांगितलं. 


आरोपीने मोबाईल वापरलाच नाही


आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना फार मेहनत घ्यावी लागली. याचं कारण हत्येदरम्यान आरोपी मोबाईलचा वापरच करत नव्हता. यामुळे त्याची माहिती मिळवताना पोलसांना फार प्रयत्न करावे लागले. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत. 


पोलिसांनी एकताचा मृतदेह मिळवला आहे. त्याचा पूर्ण सांगाडा झाला आहे. तीन तास खोदकाम केल्यानंतर मृतदेह सापडला. पोलिसांनी सध्या सांगाडा शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दुसरीकडे महिलेच्या पतीने पोलिसांवर बेजबाबदारपणे वागल्याचा आरोप केला आहे. े