Crime News: ज्या बापाने बोट पकडून चालायला शिकवलं मुलीने त्याचीच हत्या करुन संपवून टाकलं, कारण ऐकून पोलीसही चक्रावले
Crime News: मुलीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील नात्याला विरोध करत असल्याने त्यांची हत्या केल्याचा दावा मुलीने केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीसह तिच्या प्रियकराला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.
Crime News: बाप म्हणजे कुटुंबाचा आधार असतो. कोणत्याही संकटात ढाल म्हणून उभा राहणारा बाप आयुष्यभर मुलांच्या सुखासाठी संघर्ष करत असतो. कुटुंबाच्या सुखासाठी कितीही वेदना झाल्या तरी त्याची वाच्यता न करता बाप नावाचा माणूस जगत असतो. पण जेव्हा पोटचं मूल त्याच बापाचा जीव घेतं तेव्हा बसणारा धक्काही तितकाच असतो. नुकतीच अशी एक घटना समोर आली असून ज्या बापाने आयुष्यभर बोट धरुन समाजात जगायला शिकवलं त्याचीच मुलीने हत्या (Murder) केली. हत्या पाहून पोलिसांच्याही अंगावर काटा उभा राहिला.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा (Banda) एका हत्येने हादरलं आहे. एका मुलीने आपल्याच वडिलांची हत्या केल्याने लोकांना धक्का बसला असून हळहळही व्यक्त केली जात आहे. मुलीने आपल्या प्रियकरासह मिळून आधी शस्त्र आणि नंतर काठीने हल्ला करत वडिलांना संपवून टाकलं. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. हत्येच्या 48 तासानंतर पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी प्रियकराच्या मित्रालाही बेड्या ठोकल्या आहेत.
25 फेब्रवारीला ही हत्या करण्यात आली होती. मुलीने आपल्या प्रियकरासह मिळून वडिलांची काठी आणि धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली होती. यानंतर तिने आपण निर्दोष असल्याचं सिद्ध कऱण्यासाठी बनाव रचला होता. काही अज्ञात लोकांनी वडिलांची हत्या केली असून ते फरार झाल्याची खोटी बतावणी तिने पोलिसांकडे केली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता.
तपास करत असताना पोलिसांना शंका आली. यानंतर त्यांनी मुलीला अटक घेत तिची कठोर चौकशी केली. यावेळी तिने पोलिसांकडे आपणच हत्या केल्याची कबुली देत सगळा घटनाक्रम उलगडला. मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गावातील एका तरुणावर तिचं प्रेम जडलं होतं. त्याच्याशी लग्न करण्याची आपली इच्छा होती. आपण वडिलांना त्याच्याशीच लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. पण वडिलांचा या नात्याला विरोध होता. यातून ते सतत मारहाण करत होते. आपण दुसऱ्या जागी लग्न करावं यासाठी ते वारंवार दबाव आणत होते.
यानंतर मुलीने आपल्या प्रियकराशी मिळून वडिलांच्या हत्येचा कट आखला. 25 फेब्रुवारीला काठी आणि धारदार शस्त्राने वार करुन ही हत्या करण्यात आली. यानंतर हा मृतदेह शेतात फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी या हत्येचा अखेर उलगडा केला असून मुलीसह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.