Viral Marksheet House Owner News: गावातून शहरात आलेल्या माणसाला धडपड करावी लागते ती म्हणजे घर शोधण्यासाठी त्यासाठी अनेक लोकं (Viral House Owner News) धडपडताना दिसतात. घरमालकानं घर दिलं राहायला की काही चिंता नाही. घरमालक तुमच्याकडे काय अपेक्षा करतो? तुम्ही घर नीट नेटकं ठेवावं, घरात काही तोडाफोडी करू नये, घरात शांतता ठेवावी. परंतु सध्या व्हायरल (Viral News) होणाऱ्या एका पोस्टमध्ये घरमालकाची अतरंगी डिमांड पाहून तर सगळ्यांची झोपचं उडाली आहे. आपले आईवडिल, नोकरी देणारेही आपल्याकडे इतकी अपेक्षा करत नसतील जेवढी अपेक्षा या घर मालकानं केली आहे असंच म्हणावं लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातून मेट्रो सिटीमध्ये सहजासहजी घरं मिळवणं हेही कठीण होऊन जातं. त्यासाठी आपल्यालाही बरेच कष्ट करावे लागतात. त्यातून बॅचलर लोकांनाही अनेकदा घर मिळवणं हे कठीण जातं. सध्या अशाच एका भाडेकरूची व्यथा सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या व्यक्तीला बंगलोरमध्ये एक घरमालक (Marksheet News) घर द्यायला तयारही झाला होता. हा माणूस एजेंटच्या करवी घरासाठी संपर्क साधत होता परंतु त्याच्या या अतरंगी डिमांडनं मात्र त्याची झोपचं उडवून टाकली. (a house owner rejects landlord after seeing his 12th std marksheet viral news in marathi)


या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा एजेंट भाडेकरूला सर्व डॉक्यूमेंट्स विचारतो मग त्याच्याबद्दल काही शब्द लिहायलाही सांगतो. त्याचसोबत त्याच्याकडून तो बारावीची मार्कशीट, नोकरीचे सर्व डिटेल्सही मागतो. त्याप्रमाणे हा माणूस त्याला सगळं काही पाठवतो परंतु त्याची बारावीची मार्कशीट पाहिल्यानंतर मात्र तो घरमालक त्याला भाड्यानं घर देणं नाकारतो. हे वाचून भाडेकरू संतप्त होतो आणि त्याला काय बोलवं हेच सुचतं नाही. तेव्हा सध्या ही पोस्ट सगळीकडेच व्हायरल होताना दिसत आहे. ही पोस्ट ट्विटरवर @kadaipaneeeer या युझरनं पोस्ट केली आहे. तेव्हा या पोस्टखाली नेटकऱ्यांच्या तूफान कमेंट्स येताना दिसत आहेत. या युझरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की तुमच्या बारावीच्या मार्क्सनी तुमचं भविष्य कदाचित ठरणार नाही परंतु तुम्हाला बंगलोरमध्ये भाड्यानं घर मिळणार की नाही हे मात्र ठरू शकते. 



या एजेंटनं या व्यक्तीकडे त्याचे  लिंक्डइन, ट्विटर प्रोफाइल तसेच इंटरची फोटो कॉपी आणि हायस्कूलच्या मार्कशीट्स आणि आधार आणि पॅनकार्डच्या फोटो कॉपी मागितल्या. त्यानंतर दोनशे शब्दात स्वत:चे वर्णनही करायला सांगितले परंतु असं असूनही त्याला बारावीला 75 टक्के पडले म्हणून त्याला घर देण्यास घरमालकानं दिला असल्याचा निरोप त्यानं या व्यक्तीला दिला. त्या घरमालकाला 90 टक्के अपेक्षित होते.