Viral Video: रस्त्यावर पैशांचा पाऊस! 500 रुपयांच्या नोटा हवेत उडवल्या; काय आहे प्रकरण जाणून घ्या
तुम्ही कधी कोणी 500 रुपयांच्या नोटांचा गठ्ठा उडवताना पाहिले आहे का? असाच एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.
Hyderabad’s Charminar Viral Video: आपण अनेकदा लग्नसोहळ्यात लोकांना नोटा उडवताना पाहिलं आहे, पण सहसा लोक 10-20 किंवा 50-100 रुपयांच्या नोटा उडवतात. तुम्ही कधी कोणी 500 रुपयांच्या नोटांचा गठ्ठा उडवताना पाहिले आहे का? असाच एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. यात हैदराबादमधील चारमिनार येथे एक व्यक्ती 500 रुपयांच्या चलनी नोटा हवेत उडवताना दिसत आहे. एका मिरवणुकीत रात्रीच्या अंधारात एक व्यक्ती 500 रुपयांच्या नोटा हवेत फेकत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी उपस्थित काही लोकांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केली आहे.
हैदराबादमध्ये एका व्यक्तीने 500 रुपयांच्या नोटा रस्त्यावर उडवल्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ मिरवणुकीतील असल्याचे मानले जात आहे. त्या व्यक्तीने दोन वेगवेगळ्या वेळी 500 रुपयांच्या नोटांचा गठ्ठा उडवला. व्हिडीओमध्ये, कार आणि मोटरसायकलचा ताफा रात्री गुलजार हौज येथे थांबताना दिसत आहे. हे सर्वजण कुर्ते आणि शेरवानी घालून आल्याचं दिसत आहे. त्यापैकी एक जण कारंज्याकडे चालत जातो आणि नोटांचे बंडल हवेत फेकतो. पैशांचा पाऊस पडत असल्याने अनेक स्थानिक नोटा घेण्यासाठी धावत आहेत.
या घटनेनंतर पोलीस फुटेजची सत्यता तपासत आहेत. चारमिनारचे निरीक्षक बी गुरु नायडू म्हणाले की, ते लोकांची ओळख पटवण्यासाठी त्या भागातील कॅमेरा फुटेजची पडताळणी करत आहेत. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, 'एक व्यक्ती गाडीतून खाली उतरली, नोटा फेकल्या आणि निघून गेला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आम्ही घटनेची माहिती घेत आहोत. पडताळणीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.