Gobar Moblie Cover Video: आपल्याला प्रत्येक गोष्टींचा जुगाड करायला आवडतो त्यामुळे आपल्यालाही अशाच काही गोष्टींची माहिती घ्यायला आवडतेच. त्यातून सध्या सर्वच ठिकाणी आपल्या मल्टिटास्किंग आणि जुगाडाचा फंडा हा वापरावाच लागतो. त्यातून सध्या तंत्रज्ञानाचा जमाना आहे कारण त्यातून आपले काम हे हलके होऊ लागले आहे आणि सोबतच आपल्यालाही नव्या गोष्टी या फार पटकन समजत आहेत. त्यातून सोबतच आपल्यालाही त्यामुळे अपग्रेड होणं महत्त्वाचे असते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यात असाच एक जुगाड करण्यात आला आहे. खरंतर प्रत्येकवेळी आपल्याला हे माहिती असतेच की प्रत्येक नव्या इनोव्हेटिव्ह गोष्टीचा आपल्याला चांगलाच फायदा होतो त्यातून आपल्यााही त्याचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टींसाठी करता येतो त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून आता जास्त इकोफ्रेंडली गोष्टी वापरण्यावर भर दिला जातो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच काहीसा हाही व्हिडीओ आहे या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मोबाईल कव्हर बनवण्यासाठी चक्क गोबर म्हणजे गायी, म्हशीचे शेण वापरले जाते आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे परंतु हो हे शक्य करून दाखवले आहे. सध्या याचाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे सध्या नेटकरी या व्हिडीओवर नानातऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहेत. परंतु हा प्रकार फक्त करायचा म्हणून केलेला नाही. यामागे काहीतरी अर्थ आहे आणि सोबतचे याचे फायदेही अनेक आहेत. हे कव्हर बनवायचे कसे हे तुम्ही बनवणाऱ्यांवर सोडून द्या परंतु त्याचे फायदे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्काच बसेल. 


हेही वाचा - 'एवढ्याशा मानधनात घर कसं चालणार?' मराठी टेलिव्हिजन अभिनेता जरा स्पष्टच बोलला


एक गोष्ट ही पण आहे की फोन रेडियशनचा (Smart Phone Radiation) आपल्या शरीरावरही फार घातक परिणाम होताना दिसतो त्यामुळे आपल्यालाही त्याची योग्य ती काळजी ही घ्यावी लागते. खासकरून आपल्याला स्मार्टफोन्स हे लहान मुलांपासून दूर ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. जर का ते त्यांच्या सानिध्यात आले तर त्यांनाही त्याचा फटाका पोहचू शकतो. तेव्हा चला तर मग पाहुया की याचे वैशिष्ट्यं काय आणि सोबतच त्याचे फायदेही काय आहेत? 


पाहा व्हिडीओ -


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ @matiindiafoundation या इन्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहेच की गायीच्या शेणाचेही अनेक फायदे आहेत परंतु याचा फायदा मोबाईल कव्हरमुळे कसा होईल? गोवैज्ञानिक शिवदर्शन मलिक यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओत ते आपल्या त्याचे फायदे सांगितले आहेत. या व्हिडीओत ते याला टेस्ट करत आहेत. त्यांनी यात दावा केला आहे की शेणाचे कव्हरमुळे आपल्या शरीरात स्मार्टफोनचे रेडियेशन जात नाहीत. शिवदर्शन यांनी यापुर्वीही अनेक प्रयोग केले आहेत. त्यांनी शेणापासून कॉंक्रीट बनवल्याचाही प्रयोग केला आहे.