नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री जितेंद्र  सिंह यांनी सामान्य पात्रता (CET)बाबत भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारची नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आता एक सामान्य पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. 2022 च्या सुरूवातीपासून ही योजना लागू करण्यात येईल. सरकारने या परीक्षेचे नियोजन आधीच केले होते परंतु कोरोना मुळे त्याची अंमलबजावणी करता आली नाही.


केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र  सिंह यांनी म्हटले की, नॅशनल रिक्रुटमेंट एजंसी (NRA) बनवण्यात आली आहे. एनआरए सरकारी क्षेत्रातील नोकरीसांठी उमेदवारांची CET च्या माध्यमातून निवड करणार आहे. सध्या त्यासाठी कर्मचारी चयन आय़ोग(SSC), रेल्वे भर्ती बोर्ड, बँकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS)च्या माध्यमातून भरती होत असते.
 
 Common Eligibility Test (CET) चे फायदे
 CET ही SSC, RRB, IBPS साठी घेण्यात येईल. वर्षातून ही परीक्षा दोन वेळा घेण्याचे नियोजन आहे. CET च्या माध्ममातून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज नाही. त्यासाठी सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील परीक्षा देण्याची गरज पडणार नाही.