काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर लष्कराचा छापा; मोठा शस्त्रसाठा जप्त
काश्मीरमध्ये सैन्याच्या अतिरिक्त तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.
श्रीनगर: काश्मीरच्या पुलवामा परिसरात बुधवारी भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत दहशतवाद्यांच्या तळावर छापा टाकला. यावेळी भारतीय लष्कराच्या हाती मोठा शस्त्रसाठा लागल्याचे समजते. पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लष्कराकडून मोठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी काश्मीरमध्ये सैन्याच्या अतिरिक्त तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. येथील कुंगून गावात बुधवारी सकाळी स्थानिक पोलीस आणि ४४ राष्ट्रीय रायफल्सकडून संयुक्त शोधमोहीम सुरु होती. यावेळी दहशतवाद्यांचा तळ लष्कराच्या दृष्टीस पडला. प्राथमिक माहितीनुसार, या ठिकाणी मोठा शस्त्रसाठा आढळून आला. तसेच काही महत्त्वाची माहितीही लष्कराच्या हाती लागल्याचे समजते. या सगळ्याची सध्या तपासणी सुरु आहे.
अनंतनागमध्ये मेहबुबा मुफ्तींकडून सरकारविरोधात निदर्शने
जमात ए इस्लामी या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यावर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती सईद यांना संघटनेचा पुळका आला आहे. ही बंदी उठवावी यासाठी मेहबुबा यांनी अनंतनागमध्ये निदर्शने सुरु केली आहेत. जमात ए इस्लामी संघटनेवरील बंदी तातडीने उठवावी अशी मागणी मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे.