मुंबई : Aadhaar Card For Sex Workers:युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) ने जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे सेक्स वर्करसाठी आधार कार्ड जारी करण्यात येईल. यासाठी कोणत्याही निवासी प्रमाणपत्राची म्हणजेच पत्त्याच्या पुराव्याची आवश्यकता असणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

UIDAI हे वैधानिक प्राधिकरण आहे. प्राधिकरणाकडून अर्जदाराचे नाव, लिंग, वय आणि पत्ता तसेच ईमेल किंवा मोबाईल नंबर मिळवून आधार कार्ड जारी करण्यात येते.  परंतू , सेक्स वर्कर्ससाठी आधार जारी करणारी संस्था म्हणजेच UIDAI ने एक मोठी घोषणा केली आहे.


सेक्स वर्कर्ससाठी मोठी घोषणा


सेक्स वर्करचे आधारकार्ड बनवण्यासाठी पत्त्याच्या पुराव्याची अट शिथिल केली आहे. UIDAI ने सेक्स वर्कर्सकडून आधार कार्ड जारी करण्यासाठी निवासी पुरावा न मागण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सेक्स वर्करला राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. तसेच NACO च्या राजपत्रित अधिकाऱ्यांकडूनही घेतलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.