नवी दिल्ली : काश्मिर गेटच्या आयएसबीटी भागात एक ३५ वर्षांच्या व्यक्तीला एका अज्ञात वाहनाने टक्कर दिली. जखमी झालेला तो तरुण १२ तास रस्त्यावर मदतीसाठी तडफडत होता. परंतू, कोणीही मदतीसाठी फिरकले देखील नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मदत तर सोडाच पण या जखमी व्यक्तीचा मोबाईल, बॅग आणि त्याच्याकडे असलेले १२ रुपये देखील चोरण्यात आले. डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस जतीन नरवाल यांनी सांगितले की त्यांनी यासंर्भात तक्रार दाखल केली आहे. पिडीत व्यक्तीचे नाव नरेंद्र कुमार असून तो युपीमधील बिजनोर येथे राहतो. व्यवसायाने तो ड्रायवर आहे. पत्नी आणि तीन मुले असा त्याचा परिवार आहे. 


दुर्घटनेनंतर १२ तासांनी सकाळी सुमारे ६ वाजता त्याला पीसीआर व्हॅनमधून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्याचा भाऊ राजकुमार याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र हा जयपूरहुन बिजनोरला परत येत होता. त्याच वेळेस दिल्लीत ही घटना घडली. राजकुमारने दिलेल्या माहितीनुसार, ''तो आयएसबीटीला मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता पोहचला. तो बिजनोरची बस पडकण्यासाठी रस्ता ओलांडत असतानाच एका वेगवान वाहनाने टक्कर मारली.'' त्याच्या अपघाताची बातमी कळताच त्याचे कुटुंबिय दिल्लीला रवाना झाले. 


पिडीत व्यक्तीचा भाऊ राजकुमार याने सांगितले की, "त्याच्या भावावर उपचार चालू आहेत. वाहनाच्या धडकेने त्याच्या कंबर आणि पाठकणा यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला उठणे शक्य होत नाही. कारच्या धडकेने त्याची बॅग आणि मोबाईल दूरवर जावून पडले. रस्तावरुन जाणारे लोकांनी उचलले. एका व्यक्तीने पाणी पाजले आणि त्याच्या खिशातील १२ रुपये घेऊन गेला.