Jio Airtel Recharge Tariff Hike: महागाईचा भस्मासूर फक्त घरातील वाणसामान आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींच्या खर्चावर आणि आकडेमोडीवरच परिणाम करत नसून, हा भस्मासूर आता संपर्क साधण्याच्या माध्यमांवरही परिणाम करताना दिसत आहे. देशात सर्वाधिक वापरात असणाऱ्या अंबानींच्या जिओ नेटवर्कमधील दरवाढीमागोमाग आता भारती एअरटेलनंही जुलै महिन्यापासून रिचार्जच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांगलं नेटवर्क आणि सेवा देण्यासाठी ग्राहकांकडून येणारी रक्कम सराकरी 300 रुपयांहून जास्त असावी अशी स्पष्ट भूमिका एअरटेलकडून मांडण्यात आली असून, हा निर्णय उत्तम तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रममध्ये भविष्याच्या अनुषंगानं गुंतवणूक करण्यात मदत करेल असंही कंपनीकडून सांगण्यात आलं. सध्याच्या घडीला करण्यात आलेली दरवाढ किरकोळ असल्याचं म्हणत ही दरवाढ दर दिवशी 70 पैशांहूनही कमी आहे असं सांगत प्राथमिक आणि कमी दरातील प्लॅनसाठी ही दरवाढ किमान प्रमाणात लागू करण्यात आली असून, त्यांच्यावर खर्चाचा भार येणार नाही याची काळजी घेतली गेल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 


हेसुद्धा वाचा : वयाच्या 53 व्या वर्षी एलॉन मस्क 12 व्यांदा बनला बाप; रोज खातो तरी काय?


तिथं 3 जुलैपासून एअरटेलची ही दरवाढ लागू होणार असून, जिओ युजरही सध्या दरवाढीच्या या धक्क्यातून सावरत आहेत. जिओची दरवाढही 3 जुलैपासूनच लागू होणार आहे. दरम्यान, एअरटेलची ही दरवाढ नेमकी किती आणि कोणत्या स्वरुपात आहे हे पाहून घ्या.... 



Data Add-On Plans


77, 33 आणि 22 रुपयांच्या डेटा अॅड ऑन प्लॅनमध्ये अनुक्रमे 4 जीबी, 2 जीबी आणि 1 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. 


Postpaid Plans


 ₹449 रुपयाच्या प्लॅनमध्ये 40 जीबी जेटा मिळणार असून, यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS आणि Xstream Premium चं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. 


₹549 रुपयांच्या प्लॅनमध्ये 75GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग, दर दिवशी 100 SMS, Xstream Premium आणि वर्षभरासाठी Disney+Hotstar सह 6 महिन्यांसाठी Amazon Prime ची मेंबरशिप मिळणार आहे. 


₹699 च्या प्लॅनमध्ये 105GB डेटा अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS, Xstream Premium, वर्षभरासाठी Disney+Hotstar, 6 महिन्यांसाठी Amazon Prime मेंबरशिप मिळणार आहे.