Viral Video : सिंह, वाघ किंवा चित्ता हे प्राणी सगळ्याच प्राण्यांवर भारी पडतात. अनेकदा यांचे एकमेकांसोबत खेळतानाचे व्हिडिओ समोर येतातय काही व्हिडिओ तर आपल्याला पोट धरून हसवतात तर काही व्हिडिओ आपल्याला थक्क करुन सोडतात. पण सगळ्यांनाच हे व्हिडिओ पाहायला अधिक आवडतात. तितकंच लोकांचे मनोरंजन देखील या व्हिडिओमुळे होत असते. सिंह, वाघ किंवा चित्ता आपण या प्राण्यांना ताकदवान जरी समजत असलो तरी असे प्राणी देखील जंगलात आहेत जे यांच्यावर भारी पडू शकतात. यापैकी एक अस्वल आहे. अस्वल आणि वाघाशी संबंधित एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही समोरासमोर येताच एकमेकांवर तुटून पडतात. (After seeing viral video watch how bear and tiger fights nz)


आणखी वाचा - T20 World Cup : IND vs PAK सामन्यादरम्यान ऋषभ पंतला अशी वागणूक का मिळाली? Video Viral


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


वाघ आणि अस्वल भांडण


या व्हायरल व्हिडिओमध्ये जंगलात अचानक अस्वल आणि वाघ समोरासमोर आल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही एकमेकांवर राग व्यक्त करु लागतात. वाघ हल्ला करण्याआधीच अस्वलाने त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. अस्वलाचे भयावह रूप पाहून वाघाने तिथून पळ काढण्याचे शहाणपण केले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 


आणखी वाचा - दिवाळीत उधळले जातायत प्रेमाचे रंग; पाहा प्रियकरासोबत हृतिकच्या Ex Wife चा सर्वात Romantic अंदाज


 


लहान मूलांचे मनोरंजन


हा व्हिडिओ शेअर होताच अनेकांनी यावर पसंती दर्शवली. काहींनी कमेंट केल्या तर काहीजण या व्डिडिओच्या प्रेमात पडले. हा व्हिडिओ मनोरंजन करण्यासाठी योग्य आहे. शक्यतो लहान मुलांना दाखवल्यास लहान मुलांचे मनोरंजन होऊ शकते पण कृपया लहान मूल घाबरणार नाही याची खात्री केल्यानंतरच हा व्हिडिओ त्यांना दाखवा.


वाघ कोणत्याही प्राण्याला घाबरुन पळून गेल्याचे प्रकार सहसा पाहायला मिळत नाहीत. वन्य प्राण्यांशी संबंधित हा व्हिडिओ wildlife_stories_ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे.