दिवाळीत उधळले जातायत प्रेमाचे रंग; पाहा प्रियकरासोबत हृतिकच्या Ex Wife चा सर्वात Romantic अंदाज

या कपलनं ही त्यांच्या नवीन अंदाजाने सगळ्यांचे लक्ष स्वत:कडे खेचून घेतले आहे. 

Updated: Oct 25, 2022, 03:10 PM IST
दिवाळीत उधळले जातायत प्रेमाचे रंग; पाहा प्रियकरासोबत हृतिकच्या Ex Wife चा सर्वात Romantic अंदाज title=
Watch the most romantic prediction of Hrithik Ex Wife with boyfriend nz

Bollywood Diwali Party 2022 : सध्या बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीज ना जोर आला आहे. अनेक कलाकार मोठ्या जोशात आणि उत्साहात दिवाळी पार्टी करत आहेत. त्याच पार्टीना हजेरी लावायला अनेक बॉलिवूडमध्ये स्टार्स जोमानं तयारी करताना दिसत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दिवाळीची चमक कमी झाली होती पण आता सगळं पूर्व पदावर येत आहे. यावेळेस स्टार्सनी त्यांच्या स्टाईलने सगळ्यांनाच अचंबित केले आहे. या कपलनं ही त्यांच्या नवीन अंदाजाने सगळ्यांचे लक्ष स्वत:कडे खेचून घेतले आहे. हे कपल अजून कोणी नाही तर हृतिक रोशनची ex-wife सुझॅन खान (Susanne Khan) तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसह (Arslan Goni) निर्माता कृष्ण कुमारच्या दिवाळी पार्टीत पोहोचली, जिथे ते सर्वांसमोर रोमँटिक होताना दिसले. (Watch the most romantic prediction of Hrithiks Ex Wife with boyfriend nz)

हे ही वाचा - T20 World Cup : IND vs PAK सामन्यादरम्यान ऋषभ पंतला अशी वागणूक का मिळाली? Video Viral

सुझॅन  खान तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी कॅमेऱ्यात कैद

Susanne Khan Kisses Beau Arslan Goni: बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून दिवाळी पार्ट्यांच्या धुमाकूळ पाहायला मिळत आहे. गुलशन कुमार यांचा भाऊ कृष्णा कुमार यांनीही दिवाळी पार्टी आयोजित केली होती आणि त्यात अनेक स्टार्स सहभागी झाले होते. यामध्ये सुझॅन खान तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत दिसली होती आणि यादरम्यानचे त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. कृष्ण कुमारच्या दिवाळी पार्टीत दोघेही पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते. यादरम्यान दोघेही पापाराझींसमोर रोमँटिक झाले.

हे ही वाचा - Mallika Sherawat Birthday: डीपनेक ड्रेसमध्ये Mallika दिसतेय खूपच बोल्ड, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

सुझॅन खानने बॉयफ्रेंडला केली किस 

व्हिडिओमध्ये, सुझॅन खान आणि अर्सलान गोनी पहिल्यांदा पापाराझीसमोर एकमेकांना मिठी मारतात, त्यानंतर सुझॅन त्यांना किस करते. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, कॅमेऱ्यासमोर हे सर्व करणे चांगले वाटते का? आणखी एका यूजरने लिहिले की, हे लोक प्रसिद्धीझोतात येण्यासाठी काहीही करू शकतात. काहींना त्यांची केमिस्ट्री आवडत असली तरी. सुझॅन ही अभिनेता हृतिक रोशनची Ex-wife आहे. दोघांनी 2000 मध्ये लग्न केले आणि 2013 मध्ये घटस्फोट घेतला. दोघांनाही दोन मुलं आहेत, ज्यांची ते मिळून काळजी घेतात. त्याचबरोबर हृतिक सध्या अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. घटस्फोटानंतरही सुझॅन आणि हृतिक यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत.