T20 World Cup : IND vs PAK सामन्यादरम्यान ऋषभ पंतला अशी वागणूक का मिळाली? Video Viral

गेल्या 23 ऑक्टोबर रोजी T20 विश्वचषक सामना भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये चांगलाच रंगला होता.

Updated: Oct 25, 2022, 02:54 PM IST
T20 World Cup : IND vs PAK सामन्यादरम्यान ऋषभ पंतला अशी वागणूक का मिळाली? Video Viral title=
T20 World Cup Why was Rishabh Pant treated like this during the IND vs PAK match Video Viral nz

Viral Video: गेल्या 23 ऑक्टोबर रोजी T20 विश्वचषक सामना भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये चांगलाच रंगला होता. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला. हे विसरुन चालणार नाही की भारत हरता हरता विजयी झाला आणि त्याटे श्रेय विराट कोहली आणि पूर्ण टिमला जाते. या सामन्यात लोकांचे प्रेम पाहायला मिळालं अनेकांनी भारत पाकिस्तान सामन्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपलं प्रेम जाहीर केले. काहींचे व्हिडिओ तूफान व्हायरल झालेत तर काहींच्या व्हिडिओमुळे क्रिकेटरना ट्रोल करण्यात आले. हा ट्रोल होणारा क्रिकेटर अजून कोणी नाही तर ऋषभ पंत आहे. (T20 World CupWhy was Rishabh Pant treated like this during the IND vs PAK match Video Viral nz)

आणखी वाचा - IND vs PAK : विराटची बॅट तळपली, दिवाळी खरेदी थांबली

 

ऋषभ पंतचा व्हिडिओ भयान व्हायरल 

ऋषभ पंतचा (Rishabh Pant) मैदानातला एक व्हिडिओ भयान व्हायरल होत आहे. ऋषभ पंतचे मैदानात प्रवेश करताच प्रेक्षकांनी उर्वशी-उर्वशी असा जयघोष सुरू केला. मात्र, पंतने प्रेक्षकांच्या या कृतीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि तो अगदी शांत राहिला आणि सामन्यात सहभागी झाला.

हा व्हिडिओ पाहा..

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की ऋषभ पंत सामन्यादरम्यान ड्रिंक घेऊन आला आणि अर्शदीप सिंगजवळ उभा राहिला. यादरम्यान काही प्रेक्षकांनी पंतला उर्वशी-उर्वशी म्हणत चिडवायला सुरुवात केली. वास्तविक, पंत आणि बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचे नाव अनेकदा एकत्र आले आहे. अलीकडेच दोघांमध्ये एकमेकांवर कुरघोडी केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

हे ही वाचा - T20 WC 2022: फक्त तीन सामने आणि भारत उपांत्य फेरीत! पाहा कसं असेल गणित

ऋषभ पंत मात्र अबोल

आता तर असे झाले आहे की काही प्रेक्षक संधी मिळताच उर्वशीच्या नावाने पंतला चिडवू लागतात. मात्र, विशेष बाब म्हणजे ऋषभ पंत या गोष्टींवर तोशांत राहतो. अशा गोष्टींना खतपाणी घालत नाही तर तो अबोल राहणं महत्त्वाचे समजतो. भारताचा पुढचा सामना 27 ऑक्टोबरला नेदरलँडशी होणार आहे. videonation.teb नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.