The Ashok Hotel : सरकारी कंपन्या, बँक, एअरलाईनचं खासगीकरण केल्यानंतर सरकार देशातलं नामांकित आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं हॉटेल विकण्याच्या विचारात आहे.  देशाच्या राजधानीची शान असलेलं अशोक हॉटल (Ashok Hotel) सरकारकडून विकणलं जाण्याची शक्यता आहे. ऑपरेट-मेंटेन-डेव्हलप (OMD) मॉडलच्या माध्यमातून सरकारने 60 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्लान बनवला आहे. याशिवाय, पीपी मॉडेल अंतर्गत हॉटेलच्या 6.3 एक्कर जमीन कमर्शिअल वापरासाठी विकली जाईल.


हॉटेलच्या निर्मितीत पंडित नेहरुंचं योगदान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी यूनेस्को संमेलनासाठी 1960 ला याची निर्मिती केली होती. त्यावेळी हॉटेलच्या निर्मितीसाठी तीन कोटी रुपयांचा खर्च आला होता. यावरुन तुम्ही आजच्या किंमतीचा अंदाज लावू शकता. त्याकाळी, देशात सोन्याचा भाव 90 रुपये तोळा (10 Gram) असा होता, जो आज 52 हजार रुपये तोळा असा आहे.


11 एकर जमिनीवर उभं आहे अशोक हॉटेल



सूत्रांच्या माहितीनुसार हॉटेलच्या अतिरिक्त जमीनीवर पीपीपी मॉडेल अंतर्गत लग्झरी अपार्टमेंट्स बनवले जातील. देशातलं पहिलं सरकारी पंचतारांकित असलेलं अशोक हॉटेल 11 एकर इतक्या भूखंडावर उभारलेलं आहे. या हॉटेलमध्ये 550 खोल्या, 2 लाखाच्या जवळ स्केअर फुट रिटेल आणि ऑफिस स्पेस, 30 हजार स्केअर फुटमध्ये बँक्वेट आणि 25 हजार स्केअर फुटमध्ये 8 रेस्टॉरंट आहेत.


अशी आहे सरकारची योजना



सध्या आयटीडीसी (ITDC) या सरकारी कंपनीकडे अशोक हॉटेलचा मालकी हक्क आहे. या हॉटेलला ओएमडी मॉडेल प्रमाणे भाडे तत्वावर दिलं जाऊ शकतं. मीडिया रिपोर्टनुसार, या हॉटेलला जागतिक दर्जाच्या नामांकित हेरिटेज हॉटेलप्रमाणे विकसीत केलं जाणार आहे. या हॉटेलचं मॅनेजमेंट प्रायव्हेट पार्टनरकडे असणार आहे. हॉटेलकडील 6.3 एक्कर जमीनीअर 600 ते 700 प्रीमियम सर्विस अपार्टमेंट बनवल्या जातील.