अग्निवीर बनून करिअरमध्ये `उड्डाणा`ची संधी; नोकरीसाठी कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या
IAF Agniveervayu Recruitment 2024: सरकारकडून अग्नीवीर भरतीसंदर्भात पुन्हा नोटिफिकेशन काढण्यात आले आहे.
IAF Agniveervayu Recruitment 2024: देशातील तरुणांनी मोठ्या संख्येने अग्निवीर भरतीत सहभागी व्हावे यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जाते. अग्निवीरांना चांगला पगार आणि सुविधा ऑफर केला जात आहेत. शिक्षणाची अटदेखील बारावी इतकी आहे. सरकारकडून अग्नीवीर भरतीसंदर्भात पुन्हा नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. या माध्यमातून तरुणांचे देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. भारतीय वायू सेनेकडून अग्निवीर वायू सिलिकेक्शन टेस्ट घेण्यात येणार आहे. यासाठी 28 जुलैपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. पण आता तरुणांचा प्रतिसाद पाहता ही मुदत वाढवण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवर जाऊन अर्ज करता येणारआहे.
पात्रता आणि निकष
अग्निवीर भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी दहावी अधिक 2 वर्षे असे शिक्षण पूर्ण केलेले असावे. या दोन वर्षांमध्ये इंटरमीडिएट, वोकेशनल कोर्स, 3 वर्षांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा ग्राह्य धरला जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 3 जुलै 2004 च्या आधी आणि 3 जानेवारी 2008 च्या नंतर झालेला नसावा. आरक्षित वर्गातील उमेदवारांना यात सवलत देण्यात येणार आहे.
कसा कराल अर्ज?
अग्निवीर वायू सैन्य भरतीसाठी अर्ज करण्यसाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे लागे.
येथील होमपेजवर रजिस्टर बटणावर क्लिक करा.
विचारलेली सर्व माहिती भरा.
नोदणी झाल्यानंतर उमेदवारांनी लॉगिन करा. सही, फोटोग्राफ अपलोड करा.
अर्ज शुल्क भरा.यानंतर फॉर्म सबमिट करा.
अर्जाची एक प्रिंटआऊट घ्या.
अर्ज शुल्क
अग्निवीर भरतीचा अर्ज भरल्यानंतर अर्ज शुल्क भरा. अर्ज शुल्क भरल्यानंतरच फॉर्म स्वीकारला जाईल. उमेदवारांकडून 500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. सर्व उमेदवारांसाठी हे शुल्क सारखे असेल. तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड किंवा नेट बॅंकींगच्या माध्यमातून शुल्क भरता येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.
राहुल गांधींची केंद्रावर टिका
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी काही दिवसांपुर्वी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अग्निवीरांसाठी कोणती योजना जाहीर न केल्याने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधलाय. सैन्याच्या जवानांना अग्निवीरच्या चक्रव्यूहात फसवलं जातंय, असे ते म्हणाले. परीक्षेचे पेपर फुटणे ही मोठी समस्या झाली आहे. दुसरीकडे बेरोजगारीचे चक्रव्यूह आहे.10 वर्षात 70 वेळा पेपर लीक झाले आहेत. आधी तुम्ही सैन्याच्या जवानांना अग्निवीरच्या चक्रव्यूहात फसवलात. आता या बजेटमध्ये अग्निवीरांच्या पेन्शनसाठी एक रुपयाचाही निधी दिला नाहीत, अशी टीका राहुल गांधींनी संसदेतील भाषणात केली.