मुंबई : भारतीय एअरटेल ही पहिली अशी कंपनी आहे जी जिओला एकदम कडाडून टक्कर करत आहे. याचा फटका आता एअरटेलला बसला आहे. 15 वर्षानंतर पहिल्यांदा एअरटेलला इतकं मोठं नुकसान झाला आहे. भारतीय बिझनेसमध्ये जवळपास 15 वर्षांत एढा मोठा फटका बसला आहे. अर्थ वर्ष 2017 - 18 मध्ये चौथ्या क्वॉर्टरमध्ये कंपनीने प्राइसिंगच्या मोर्चावर रिलायन्स जिओच्या आक्रमक स्वरूपाला सामोरे जावे लागत आहे. 


652 करोड रुपयांचा फटका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील मित्तलच्या नेतृत्वाखाली असलेल्या कंपनीने मंगळवारी याबाबतची माहिती दिली आहे. कंपनीने एक्सेप्शनल आयटम्स काढून मार्च महिन्यापर्यंत नेट लॉस652.3 करोड रुपये झाला आहे. एक वर्षाअगोदरच्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीला 770.8 इतका फायदा झाला होता. एअरटेलमध्ये सिंगटेलची 39.5 टक्के हिस्सेदारी आहे. 


आफ्रिकेतील बिझनेसमध्ये फायदा 


टेलिकॉम मार्केटची लीडर कंपनी एअरटेलच्या चौथ्या क्वार्टरमध्ये कंसॉलिडेटेड बेसिसवर 83 करोड रुपयांचा नेट फायदा झाला आहे. मात्र गेल्या वर्षभरात याचे प्रमाण 78 टक्क्यांनी कमी झाले आहे. आफ्रिकेतील कामकाज सुधारण्यासाठी कंसॉलिडेटेड बेसिसवर फायदा झाला आहे. कंपनीने आफ्रिकेच्या व्यवहारात 698.7 करोड रुपयांचा फायदा झाला आहे.