मुंबई : सध्या आंब्याचा हंगाम आहे आणि उद्योगपती हर्ष गोएंका यांनी या फळांच्या सर्वात महागड्या जातींपैकी एक असलेल्या फळांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तुम्ही मियाझाकी पाहू शकता, जे प्रामुख्याने जपानमध्ये पिकवल्या जाणार्‍या आंब्याची एक अशी जात किंवा प्रकार आहे, जो फारच दुर्मिळ आहे. त्यामुळेच ते पिकवणाऱ्यांना त्याच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घ्यावी लागते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RPG ग्रुपच्या अध्यक्षांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ''मियाझाकी, एक असामान्य रुबी रंगाचा जपानी जातीचा आंबा आहे, हा जगातील सर्वात महागडा आंबा आहे, जो प्रति किलो ₹ 2.7 लाख दराने विकला जातो. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये परिहार या शेतकऱ्याने दोन झाडे सुरक्षित करण्यासाठी तीन सुरक्षा रक्षक आणि 6 कुत्रे ठेवले आहेत.''


जबलपूरमध्ये हा जपानी जातीचा आंबा आल्यामुळे त्याला सांभाळून ठेवणे फारच गरजेचं आहे, ज्यामुळे त्याला इतकी मोठी सुरक्षा दिली गेली आहे. हे झाड परिहार नावाच्या व्यक्तीकडे आहे.


एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, परिहारला रेल्वे प्रवासादरम्यान एका व्यक्तीकडून मियाजाकीचे रोप मिळाले.


झाडावरचे माणिक रंगाचे आंबे जपानी असतील याची या दाम्पत्याला कल्पनाही नव्हती. मियाझाकी आंब्यांना त्यांच्या आकारामुळे आणि लाल रंगामुळे अनेकदा 'एग्ज ऑफ सनशाईन' (जपानी भाषेत तैयो-नो-तामागो) असे संबोधले जाते.



आंब्याचे सरासरी वजन सुमारे 350 ग्रॅम असते


मियाझाकी आंब्यांना त्यांचे नाव जपानमधील शहरातून मिळाले आहे, जेथे ते पिकवले जातात. या एका आंब्याचे सरासरी वजन सुमारे 350 ग्रॅम असते. अँटिऑक्सिडंट्स, बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक अॅसिडने समृद्ध, हा आंबा एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान कापणीच्या हंगामात पिकवला जातो.


जपानी ट्रेड प्रमोशन सेंटरच्या मते, मियाझाकी हा 'इर्विन' आंब्याचा एक प्रकार आहे जो दक्षिणपूर्व आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकवल्या जाणार्‍या पिवळ्या पेलिकन आंब्यापेक्षा वेगळा आहे.


हे जपानी सामान्य लोकांसाठी खूप खास आहे


मियाझाकीचे आंबे संपूर्ण जपानमध्ये पाठवले जातात आणि त्यांचे उत्पादन प्रमाण जपानमधील ओकिनावानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्थानिकांच्या मते मियाझाकीमध्ये आंब्याचे उत्पादन 70 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 80 च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाले.


शहराचे उबदार हवामान, दीर्घकाळ सूर्यप्रकाश आणि मुबलक पाऊस यामुळे मियाझाकीच्या शेतकऱ्यांना आंबा लागवडीकडे जाणे शक्य झाले, असे अहवालात म्हटले आहे. हे आता येथील मुख्य उत्पादन आहे.