मुंबर्ई : बॉलिवूड कलाकार अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी मुलाखात घेतली आहे. या मुलाखातीत अक्षय कुमारने मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत. मोदींकडूनही या प्रश्नांना उत्तम प्रतिसाद मिळला होता. त्यावेळी अक्षयने त्यांच्या कुटुंबाशी संबधित प्रश्न विचारला होता. त्यावर मोदीं म्हणाले की, ते त्यांच्या कुटूंबासोबत राहत नाहीत, कारण त्यांनी खूप कमी वयातच घर सोडले होते. मोदींनी त्यांच्या आईला सोडले तर, कुंटुबातील कोणत्याच सदस्याशी त्यांची जवळीक नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमारने मंगळवारी त्याच्या अधिकृत अकाउंटवरुन ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये मोदींशी निष्पक्ष आणि राजकीय विषयांवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच काही वेगळं करण्याचा अक्षय प्रयत्न करीत आहे. याआधी त्याने अशी मुलाखत कुणाचीच घेतली नव्हती, ट्विट करताना तो म्हणाला आहे. 


या मुलाखातीत अक्षयने नरेंद्र मोदी यांना कुटुंबाच्या बाबतीत एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना मोदी म्हणाले की, 'मी कुटुंबासोबत राहत असताना प्रंतप्रधान झालो असतो तर, कदाचित कु़टुंबासोबत राहिलो असतो. 


परंतु अगदी लहान वयातच मी माझे घर सोडले. त्यामुळे कुटुंबापासून दूरावत गेलो. ज्या वेळी मी घर सोडले, तेव्हा मला खूप  अडचणींचा सामना करावा लागला. परंतु आता या गोष्टींची सवय झाली आहे', असेही मोदी म्हणाले.



कुटुंबापासून लांब राहिलो. मात्र मोदी त्यांच्या आईपासून दूर राहू शकले नाहीत. जेव्हा ते पंतप्रधान झालो, तेव्हा सर्वात आधी मोदींनी त्यांच्या आईचा आशीर्वाद घेतला होता. 'मला वेळ नसल्यामुळे मी आईसोबत राहू शकत नाही. पण जेव्हा मला वेळ मिळेल, तेव्हा मी आईला भेटायला नक्की जातो, असे त्यांनी यावेळी सांगितले.'