Court News: अलाहाबाद हायकोर्टाच्या (Allahabad High Court) लखनऊ खंडपीठाने (Lucknow Bench) इस्लाममध्ये लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहणं आणि शारिरीक संबंध प्रस्थापित करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. कोर्टाने हिंदू तरुणीच्या याचिकेवर सुनावणी करताना इस्लाममध्ये (Islam) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं चुकीचं असल्याचं सांगितलं. पोलीस आपला छळ करत असल्याचा आरोप करत प्रेमी युगुलाने सुरक्षेची मागणी केली होती. पण कोर्टाने तिची याचिका फेटाळून लावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाच्या न्यायाधीश संगीता चंद्रा आणि नरेंद्र कुमार जौहरी यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी  कोर्टाने याचिका फेटाळताना सांगितलं की, ही एक सामाजिक समस्या आहे जी सामाजिक पद्धतीनेच दूर केली जाऊ शकते. यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्याची कोणतीही गरज नाही. 


29 वर्षीय हिंदू तरुणी आणि 30 वर्षीय मुस्लीम तरुणाने ही याचिका केली होती. दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होते. तरुणीने याचिकेत आरोप केला होता की, पोलीस तिला त्रास देत आहेत. त्यामुले आपल्याला सुरक्षा दिली जावी. तरुणीच्या आईनेही पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, जिचा उल्लेख याचिकेत करण्यात आला होता. यानंतर पोलिसांवर त्रास दिल्याचा आरोप करत सुरक्षेची मागणी करण्यात आली. आपली आई या नात्यावर खूश नसल्याचं तरुणीने यावेळी सांगितलं.


याचिकेत लग्नाचा उल्लेख नाही - कोर्ट


कोर्टाने याचिकेचा उल्लेख करत म्हटलं की, यामध्ये याचिकाकर्त्यांनी भविष्यात लग्न करण्याची इच्छा आहे किंवा करणार आहोत याचा कुठेच उल्लेख केलेला नाही. इस्लामनुसार, लग्न केल्याशिवाय शारिरीक संबंधांना मान्यता दिली जाऊ शकत नाही. याशिवाय इस्लामामध्ये लग्नाआधी आकर्षण, सेक्स, स्पर्श, चुंबन या गोष्टी हराम आहेत. 


कोर्टाने सांगितली कुराणमध्ये लिहिलेली शिक्षा


कोर्टाने सांगितलं की, पत्नी-पत्नी वगळता कोणत्याही प्रकारचा सेक्स किंवा शारिरीक संबंधाला कायदेशीर मान्यता नाही. कोर्टाने हेदेखील सांगितलं की, जर कोणी असं करत असेल कुराणमध्ये तरुणाला 100 फटके आणि महिलेला मरेपर्यंत दगडाने ठेचण्याची शिक्षा असल्याचं सांगितलं.