मुंबई : आदिशक्ती देवीचे अनेक शक्तीपीठं भारतात आहेत. त्यांच्या आपआपल्या पुरातन मान्यता देखील आहेत. भारतात देवीची 51 शक्तीपीठं आहेत. असं म्हटलं जातं की  देवी सतीच्या शरीराचे भाग जेथे जेथे पडले होते. तेथे शक्तीपीठं तयार झाली. सध्या चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. आई जगदंबेच्या एका चमत्कारी मंदिराबाबत आपण आज माहिती करून घेणार आहोत.  या मंदिरात देवीची कोणतही मूर्ती नाही. तरीदेखील पुजारी डोळ्यांवर पट्टी बांधून पूजा करतात. नक्की काय आहे  यामागचे कारण वाचा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात अंबाधाम म्हणजेच माता अंबाजीचं प्राचिन मंदिर आहे.  भारतातच नाही तर जगभरातील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर अहमदाबादपासून 18 किलोमीटर लांब आहे. असं म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णचे मुंडन संस्कार याच मंदिरात झाले होते.


तसेच भगवान श्रीराम रावणाशी युद्ध करण्यासाठी या ठिकाणाहून गेले होते. त्यावेळी अंबाजी मातेने त्यांना दिव्य बाण दिले होते. अंबाजी मातेचे मंदिर देशातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. असं म्हटलं जातं की, या ठिकाणी देवी सतीचे हृदय पडले होते.
 
या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजेच येथील पुजारी डोळ्यांवर पट्टी बांधून पूजा करतात.  हे आजवरचे सर्वात मोठे रहस्य आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात माता अंबाजीची कोणतीही मूर्ती नाही. परंतु अंबा यंत्राची पूजा केली जाते. 


माता अंबाजीच्या या यंत्राला आतापर्यंत गुप्त ठेवले गेले आहे. या यंत्राला पाहू नये अशी मान्यता आहे. त्यामुळे पुजारीसुद्धा डोळ्यांवर पट्टी बांधून पूजा करतात. नवरात्रीच्या दरम्यान अंबाजीच्या मंदिरात मोठी गर्दी असते. 



( हा लेख सामान्य माहिती आणि मान्यतांच्या आधारावर आहे .झी 24 तास याची खात्री देत नाही )