मुंबई : आपल्या चांगल्या भविष्यासाठी प्रत्येक जण आर्थिक गुंतवणूक करतो. जनतेला आर्थिक चणचणीचा सामना करायला नको म्हणून केंद्र सरकारने (Central government scheme)  सर्वसामांन्यासाठी एक सर्वोत्तम योजना आणली आहे. या योजनेत गुंतवणून केल्यास तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. प्रधानमंत्री श्रम योदी मानधन योजना (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan) ही सर्वोत्तम पेन्शन योजनेपैकी एक आहे. ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. (An investment of 55 Rupee in Pradhan Mantri Shram Yodi Mandhan scheme and will get Rs 36000 every year)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

18-40 या वयोगटातील प्रत्येक जण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. कारण या योजनेचा हफ्ता हा वयाच्या आधारावर ठरवला जातो. या योजनेनुसार गुंतवणूकदाराला 36 हजार पेन्शन देण्यात येणार आहे. गुंतवणूकदाराला प्रति महिना 3 हजार यानुसार वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन म्हणून देण्यात येईल. 


या योजनेचा फायदा देशातील प्रत्येक जण घेऊ शकतो. तसेच योजनेत गुंतवणूक करण्यासाठी जनसेवा केंद्रात जाऊन PM-SYM खातं उघडु शकतो. पण यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबूक बंधनकारक असणार आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर खातेधारकाला ओळखपत्र म्हणून श्रम योगी कार्डही (Shram Yogi Card) देण्यात येते. 


या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना दरमहा काही पैसे गुंतवावे लागतील. या योजनेद्वारे वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर सरकार गुंतवणूकदारांना दरमहा 3 हजार रुपयांच्या पेन्शनची हमी देते. या योजनेद्वारे गुंतवणूकदारास आजीवन पेन्शन मिळते. विशेष म्हणजे आपण या योजनेत जितके योगदान द्याल त्यानुसार सरकार अधिक पेन्शन तुम्हाला देईल.  
   
संबंधित बातम्या : 


सोन्यात गुंतवणूक करून बक्कळ नफा मिळवण्यासाठी चांगली संधी! कमाईसाठी ही स्ट्रॅटेजी वापरा


30 जूनपर्यंत हे काम पूर्ण करा, अन्यथा 10 हजारांचा आर्थिक फटका आणि.....