30 जूनपर्यंत हे काम पूर्ण करा, अन्यथा 10 हजारांचा आर्थिक फटका आणि.....

तुम्ही जर हे काम पूर्ण केलं नाहीत, तर तुमच्या समस्येत वाढ होऊ शकते.

Updated: Jun 19, 2021, 11:00 PM IST
30 जूनपर्यंत हे काम पूर्ण करा, अन्यथा 10 हजारांचा आर्थिक फटका आणि.....

मुंबई : पॅन कार्डला आधार कार्डासोबत लिंक करण्याचे (PAN-Aadhaar Linking)आवाहन आयकर विभाग आणि सरकार सातत्याने करत आहेत. सरकारने आतापर्यंत अनेक वेळा पॅन आधारसोबत लिंक करण्यासाठीच्या तारखेत मुदतवाढ केली आहे. सध्या पॅन-आधार लिंक करण्यासाठी अंतिम मुदत 30 जून आहे. अशा परिस्थितीत, जर तुमचा पॅन आणि आधार अद्याप लिंक केला  नसेल तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. तुम्ही जर हे काम पूर्ण केलं नाहीत, तर तुमच्या समस्येत वाढ होऊ शकते. (link pan card with aadhar by 30 june 2021 or else 10 thousand penalty)
 
पॅन-आधारसोबत लिंक नाही केलं तर काय होईल, असा प्रश्न अनेकांच्या मनात घोंघावतोय. पण जर पॅनसोबत आधार लिंक केला नाही, तर 1 जुलैपासून पॅन कार्ड रद्द होईल.   

KYC वर परिणाम होणार

पॅन कार्ड इन अॅक्टिव्ह होताच त्याच थेट परिणाम हा केवायसीवर होईल. आपला ग्राहक कोण आहे, हे केवायसीच्या आधारे ओळखण्यास सोप्पं ठरतं. तसेच तुम्हाला आर्थिक भुर्दंड ही सहन करावा लागू शकतो. जर तुमच्या बचत खात्यात 10 हजारांपेक्षा व्याजाची रक्कम जमा होत असल्यास 10 टक्के TDS आकारला जातो. यासाठी पॅन कार्ड बंधनकारक असतं.  पण पॅन कार्ड नसल्यास अधिकचा 10 टक्के म्हणजेच एकूण 20 टक्के TDS आकारला जाईल.   
 
कोणत्याही बॅंक खात्यात 50 हजारांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक असतो.  पण पॅन कार्ड डिअॅक्टीव्ह असल्यास बॅंकेकडून चुकीचा पॅन नंबर गृहीत धरला जाईल. त्यामुळे नियमांनुसार संबंधित व्यक्तीला 10 हजारांचा दंड भरावा लागू शकतो.    

प्राप्तिकर अधिनियम 1961 च्या कलम 272 बी नुसार, कलम 139A च्या काही नियमांचे उल्लंघन झाल्यास या कलमांतर्गत अधिकारी 10 हजार रुपये दंड आकारू शकतात. कलम 139A च्या  पोट-कलम 1 नुसार, एखाद्याचा पॅन तयार केलेला नसेल तर त्याने आपल्या पॅनसाठी अर्ज करावा. याशिवाय 139AAअंतर्गत पॅन आणि आधार देखील जोडले जाऊ शकतात.

त्यामुळे या समस्यांना तोंड देण्याऐवजी सरकारकडून देण्यात आलेल्या मुदतीत  पॅन-आधारसोबत लिंक करुन घ्या. 

संबंधित बातम्या :

आता घरबसल्या Ration Cardमध्ये नाव जोडता येणार, कसं ते जाणून घ्या

नवा कामगार कायदा : आठवड्याला 5 दिवसांऐवजी फक्त 4 दिवस करा काम, 3 दिवसांची सुट्टी