केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल कोरोना पॉझिटिव्ह, AIIMS मध्ये दाखल
कोरोनापासून बचाव करणाऱ्या पापडाची करत होते विक्री
मुंबई : केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मेघवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कोरोनाची लक्षण दिसत होती. पहिल्यांदा कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली मात्र दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली.
अर्जुन राम मेघवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी प्रकृती आता ठिक आहे. ट्विटमध्ये असं म्हटलंय की, कोरोनाची सुरूवातीची लक्षण दिसू लागल्यावर मी चाचणी केली. पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र दुसऱ्यांचा चाचणी केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझी तब्बेत आता ठिक आहे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली काळजी घ्यावी. आरोग्य सांभाळा.
राजस्थानचे आणि एक खासदार कोरोना पॉझिटिव्ह झाली आहेत. कैलाश चौधरी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. अर्जुन राम मेघवाल हे बीकानेरचे भाजप खासदार आहेत. मेघवाल यांचा काही दिवसांपूर्वी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत ते पापडाचा प्रचार करत होते. त्यांनी प्रचार करताना असं म्हटलं होतं की, कोरोनापासून हे पापड तुम्हाला दूर ठेवू शकतं म्हणून या पापडाचं सेवन करा. 'वोकल ऑफ लोकल' म्हणतं मोहिम सुरू केली होती. पण या व्हिडिओमुळे त्यांच्यावर खूप टीका झाली आहे.