नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरी गेलेली कार सापडली आहे. मात्र, या कारमध्ये तलवार सापडल्याने चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केजरीवाल यांची तीन दिवसांपूर्वी कार चोरीला गेली होती. मात्र, आज ही कार पोलिसांना सापडली आहे. गाझियाबादच्या मोहन नगरातून पोलिसांनी ही कार ताब्यात घेण्यात आली आहे.


तीन दिवसांपूर्वी दिल्ली सचिवालयाबाहेर ही कार चोरी झाल्या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज मिळालालेय. चोरी झाल्याच्यावेळी ही कार आम आदमी पक्षाच्या मीडिया विभागातील एक महिला वापरत होती. 'त्याच रंगाची आणि मॉडेलची कार आम्हाला गाझियाबादमध्ये सापडली आहे. आम्ही इंजिन आणि इतर गोष्टी तपासत आहोत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिलेय.



केजरीवाल हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद स्विकारण्याण्यापूर्वी या कारचा वापर करत होते. २०१३ मध्ये दिल्लीचे ४९ दिवसांचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हीच कार वापरली होती. आपल्या कॉमन मॅन इमेजला साजेशी गाडी म्हणून या कारचा केजरीवाल वापर करत होते.


ही कार एका अनिवासी भारतीयाने भेट दिल्यानंतर गाजावाजा झाला होता. २०१४मध्ये ही कार प्रकाशझोतात आली होती. त्यावर्षी दिल्ली पोलिसांविरुद्ध केलेल्या आंदोलनादरम्यान केजरीवाल यांनी ही कार झोपण्यासाठीदेखील वापरली होती.


तसेच विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल याच कारचा दौऱ्यासाठी वापर करीत होते. ‘व्हीआयपी’ संस्कृतीच्या विरोधाचे प्रतीक म्हणून आम आदमी पक्षाने या कारचा उपयोग केलाय.