मुंबई : काही दिवसांपासून गगनाला भिडणाऱ्या सोन्याच्या दराने आणखी एक उच्चांक गाठला आहे. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्री बाजारामध्ये सोन्याचे दर वाढल्यामुळे याचे थेट परिणाम शेअर बाजार आणि गुंतवणूकीच्या इतर पर्यायांवर होताना दिसत आहेत. याच परिस्थिती सोन्याच्या नव्या वत्सू, दागिन्यांची खरेदी करण्याचा विचारच अनेकांनी दूर सारला आहे. असं असलं तरीही तुमच्याकडे असणारं ठेवणीतलं सोनं यावेळी मोठं फायद्याचं ठरणार आहे, ज्यामुळे तुम्हाला चक्क पैसे कमवता येणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून राबवण्यात आलेल्या एका योजनेअंतर्गत हा नफा कमवणं साध्य होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठेवीवर मिळतं प्रमाणपत्र 
स्टेट बँकेच्या या योजनेअंतर्गत तुम्ही बँकेकडे ठेवत असणाऱ्या सोन्य़ाचं परीक्षण केलं जातं. ज्यानंतर त्या आधारे संबंधित व्यक्तीला याचं एक प्रमाणपत्र देण्यात येतं. तुम्ही तुमचं सोनं बँकेकडे १ के पंधर वर्षांच्या कालावधीसाठी ठेवू शकता. पुढे ठेवीची मुदत संपल्यानंतर ती व्याजासहित परत मिळवू शकता. तुमची इच्छा असल्याच सोन्याऐवजी रोख स्वरुपातही ही ठेव परत घेऊ शकता. 


कोण करु शकतं यात गुंतवणूक? 
SBI च्या अधिकृत संकेतस्थळावरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार भारतीय नागरिकत्व प्राप्त असणारी व्यक्ती या योजनेस पात्र आहे. ठेवीदार यासाठी एकल किंवा जोड खातं सुरु करु शकतात. HUF किंवा पार्टनरशिप फर्मसुद्धा यामध्ये गुंतवणूक करु शकते. या योजनेअंतर्गत कमीत कमी ३० ग्रॅम सोनं ठेव स्वरुपात देणं गरजेचं आहे. यासाठी जास्तीत जास्त मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. 


किती वर्षांसाठी आहे ही ठेव योजना? 
स्टेट बँकेकडून या योजनेसाठी शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट (STBD)चा पर्याय उपलब्ध आहे. ज्यामध्ये सोनं १ ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी ठेव स्वरुपात देता येतं. तर मध्यम आणि दीर्घकालीन अर्थान मीडियम, लाँग टर्म ठेवीसाठी अनुक्रमे ५ ते ७ आणि १२ ते १५ अशा कालावधीचा पर्याय आहे. कोणताही ठेवीदार ठरलेल्या मुदतीपूर्वीच पैसे परत घेतो तर त्याला / तिला व्याजदरावर असणारी दंडात्मक रक्कम भरावी लागणार आहे. SBI च्या या योजनेत मीडियम टर्मसाठी ३ वर्षांनंतर आणि लाँग टर्मसाठी ५ वर्षांनंतर योजनेतून बाहेर पडता येऊ शकतं. 


५ टक्क्यांपर्यंत व्याजदर 
STBD योजनेत जास्तीत जास्त ५ टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळणार आहे. एक वर्षाच्या गुंतवणूकीत ०.५० टक्के, दोन वर्षे ०.५५ टक्के, तीन वर्षे ०.६० टक्के अशा प्रमाणात व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत. मीडियम टर्मसाठी २.२५ टक्के आणि लाँग टर्मसाठी २ ते ५ टक्के इतका व्याजदर ठरवण्यात आला आहे. 


निष्क्रीय सोन्यावर मिळणार व्याज 
घरात असणाऱ्या सोन्याचाही आता फायदा होणार आहे. ज्यावर स्टेट बँकेकडून व्याज देण्यात येणार आहे. गोल्ड डिपॉझिट स्कीम अंतर्गत व्याज, गोल्डज मुद्रा यांची मोजणी होते आणि त्यानंतर रुपयाच्या तुलनेने किंमत ठरते. 


सोन्याची किंमत वाढल्यास फायदा
SBIच्या या योजनेमध्ये मॅच्योरिटी अर्थात योजनेच्या अखेरीस त्या दिवसाच्या दराच्या हिशोबाने परतफेड केली जाणार आहे. त्यामुळे एकंदरच सध्याची परिस्थिती पाहता सोन्यात गुंतवणूक करणं अतिशय फायद्याचं ठरणार आहे. कारण, येत्या काळात सोन्याच्या दरांचा हा चढता क्रम सुरुच राहणार आहे.