Assam Ola-Uber Services:  सध्या काळ्या पिवळ्या टॅक्सीपेक्षा जास्त पसंती ओला-उबर (ola-uber) या गाड्यांना मिळत आहे. रिक्षा- टॅक्सीच्या भाड्यापेक्षा कमी पैशात ते ही एसी गाडीत प्रवास करायला मिळतो. शिवाय ऑफरचा लाभही मिळतो. पण आता कदाचित तुम्हाला या ओला उबर गाड्यांनी प्रवास करता येणार नाही. कारण भारतातील एका शहरात ओला-उबरची कॅब (ola-uber cab) सेवा बंद होणार आहे. ही सेवा आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून बंद होणार असून ही सेवा बंद करण्याचा निर्णय ऑल आसाम कॅब मजदूर संघ आणि ऑल गुवाहाटी बाइक आणि टॅक्सी युनियनने घेतला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील मोठं-मोठ्या शहरांसह आता लहान शहरांतही ओला-उबरने आपली पकड मजबूत केली आहे. अनेक छोट्या शहरांतही ओला आणि उबेरची सुविधा आहे. परंतु ईशान्येतील गुवाहाटीमध्ये ओला-उबरची ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण म्हणजे कॅब एग्रीगेटर्सकडून कॅब चालकांचा सतत छळ होत असल्याचा आरोप कॅब मजदूर संघ आणि ऑल गुवाहाटी बाइक आणि टॅक्सी युनियनने केला आहे. कंपनीने दिलेली कॅब सेवा दिशाभूल करणारी असून त्यामुळे चालकांची पिळवणूक होत असल्याचे ही सांगण्यात आले आहे. 


वाचा: गरिबांना 2024 पर्यत मोफत धान्य, लाभार्थींच्या खात्यात थेट मदत


ऑल आसाम कॅब मजदूर (All Assam Cab Mazdoor) संघातर्फे सांगण्यात आले की, आसाममध्ये ओला आणि उबेरची (ola-uber) सेवा 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. पहिल्या वर्षी या कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर मात्र चालकांचा सतत छळ होत गेला. तसेच प्रत्येक फेरीसाठी कॅब चालकाकडून 40-60 टक्के कमिशन आकारले जात असल्याची माहिती युनियनकडून देण्यात आली. याशिवाय चालकांकडून डायनॅमिक भाडेही घेतले जात आहे. 


आसामच्या वृत्तानुसार, सध्या ओला आणि उबेर अंतर्गत सुमारे 18 हजार कॅब रस्त्यावर धावत आहेत. याशिवाय बाईक टॅक्सी ऑपरेटर युनियनही 1 फेब्रुवारीपासून रॅपिडोची सेवा बंद करत आहे. यामुळे 16000 रॅपिडो बाईक सेवा बंद होणार आहे. परिणामी कॅब आणि बाईक चालकांनी सरकारला नवीन अॅप लॉन्च करण्याची विनंती केली आहे जेणेकरून ते सेवा देत राहतील. 


 Ola-Uber ड्रायव्हर्सने राईड कॅन्सल केली तर अशी करा तक्रार


राईड संपल्यानंतर काही कारणास्तव तक्रार दाखल करता आली नाही, तर वेबसाईटवर जाऊन तक्रार करू शकता. Ola मध्ये तक्रार करण्यासाठी https://help.olacabs.com/support/home लिंकवर क्लिक करा आणि आपली तक्रार दाखल करा.  त्याशिवाय Uber शी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी https://help.uber.com/riders/section/trip-issues-and-refunds?isJobPickerOpen=true&nodeId=595d429d-21e4-4c75-b422-72affa33c5c8 या लिंकवर क्लिक करू शकता.