Budget 2023 LIVE Updates : मोठी घोषणा, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

Union Budget 2023 Live Updates : मोदी 2.0 सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन  आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे. तसेच महिलांसाठी बचत गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. महिलांसाठी मोठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवेबरोबरच कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना असणार आहे. पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच 2.40 लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली असून देशात 50 नवीन विमानतळांची उभारणी करणार आहे, अशी माहिती र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी  बजेट सादर करताना दिली.  

Budget 2023 LIVE Updates : मोठी घोषणा, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

Union Budget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2023अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन  आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे. तसेच महिलांसाठी बचत गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. महिलांसाठी मोठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवेबरोबरच कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना असणार आहे. पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच 2.40 लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली असून देशात 50 नवीन विमानतळांची उभारणी करणार आहे, अशी माहिती र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी  बजेट सादर करताना दिली.

 

1 Feb 2023, 14:09 वाजता

मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्ण करणारे बजेट - देवेंद्र फडणवीस

Budget 2023 Updates : महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पाने सहकार क्षेत्राला महत्त्व दिलं आहे. आपल्या पतसंस्थांना मल्टिपर्पज सोसायटीचा दर्जा मिळतोय. त्यामुळे आता गावपातळीवर सहकार क्षेत्र मजबूत होणार आहे.अमृत काळातील सर्वमान्य समाधानकारक अर्थसंकल्प आहे. पुढच्या काळात विकसीत भारत जाणारे हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. राज्यांना पायाभूत सुविधा वाढण्यासाठी फायदा होणार आहे. 1 कोटी नैसर्गिक शेती साठी फायदा होणार आहे. शेती क्षेत्रात डिजिटल फायदा होण्यासाठी फायदा होणार आहे. तसेच हे बजेट मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्ण करणारे बजेट आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

1 Feb 2023, 13:54 वाजता

मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरीतच - शशी थरुर

Budget 2023 Updates : अर्थसंकल्पामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. पण यामध्ये मनरेगा योजनेचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. यासोबत ग्रामीण भागातील गरीब मजूर, रोजगार आणि महागाईबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. काही मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिले आहेत, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस खासदार शशी थरुर यांनी दिली आहे.

1 Feb 2023, 13:44 वाजता

अर्थसंकल्पातून पहिल्यांदाच सामान्यांना मोठा दिलासा  - नितीन गडकरी

Budget 2023 Updates : "अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पायाभूत सुविधांना प्राधान्य दिलं आहे. आपला अर्थसंकल्पात देखील मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे रस्त्यांचा विकास आणि सुविधा निर्माण करण्याचा आमचा निर्धार पूर्ण होणार आहे. हरित प्रकल्पांमुळे आपल्या पर्यावरणाला मोठा फायदा होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे सामान्यांना प्रदूषणामुळे होत असलेला त्रास देखील कमी होणार आहे. पहिल्यांदाच सामान्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे," असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

1 Feb 2023, 12:45 वाजता

मोठी घोषणा : 7  लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
 
असा असेल नवीन टॅक्स स्लॅब
Income    Tax %

0 ते तीन लाख    0 %
3 ते 6 लाख     5 %
6 ते 9 लाख     10 %
9 ते 12 लाख    15 %
12 ते 15 लाख    20 %
15 लाखांपेक्षा जास्त    30 %

1 Feb 2023, 12:26 वाजता

Income tax slab बाबत मोठी घोषणा

Budget 2023 Updates :  Income tax slab बाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. 7  लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त  झाले आहे.

1 Feb 2023, 12:23 वाजता

सिगारेट महाग तर टीव्ही, मोबाईल स्वस्त; अर्थमंत्र्यांची घोषणा

Budget 2023 Updates : अर्थसंकल्पात काय स्वस्त काय महाग होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबत घोषणा केल्या आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनुसार, सिगारेट, परदेशातून येणाऱ्या चांदीच्या वस्तू महागणार आहे. तर टीव्ही, काही मोबाईल फोन, कॅमेरा लेन्स, खेळणी, सायकल, ऑटोमोबाईल्स स्वस्त होणार आहेत. 

1 Feb 2023, 12:19 वाजता

सोने, चांदी महागणार

Budget 2023 Updates  :  सोने आणि चांदीच्या वस्तूंवर कस्टम ड्युटी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे सोने, चांदी महागणार आहे.

1 Feb 2023, 12:17 वाजता

Budget 2023 : मोबाईल फोन स्वस्त होणार

- TV चे सुटे  भाग स्वस्त होणार
- TV होणार स्वस्त होणार
- इलेक्ट्रिक कार (EV Car) स्वस्त होणार

1 Feb 2023, 12:08 वाजता

अर्थसंकल्पात तरुणांसाठी मोठ्या घोषणा

Budget 2023 Updates : "आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले असून लाखो तरुणांना कौशल्य निर्माण करण्यासाठी पंतप्रधान कौशल विकास योजना 4.0 सुरू केली जाईल. या योजनेत ड्रोन आणि थ्रीडी प्रिंटिंग सारख्या नवीन युगातील अभ्यासक्रमांचाही समावेश असेल. 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल केंद्रे विविध राज्यांमध्ये सुरु करण्यात येणार आहेत. युनिफाइड स्किल इंडिया प्लॅटफॉर्म लाँच करण्या येणार आहे," अशी घोषणा सीतारामन यांनी केली आहे. 

1 Feb 2023, 12:08 वाजता

महिलांसाठी मोठी घोषणा

 Budget 2023 Updates :  महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेटची घोषणा. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करुन दिले जाणार. दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करुन दिले जाईल. 2 लाख रुपये एखादी महिला किंवा मुलीच्या नावे दोन वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदरावर गुंतवण्याची सुविधा उपलब्ध. काही प्रमाणात ही रक्कम काढण्याचीही परवानगी असेल. 

 - महिला बचत योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट
- 2 वर्षांसाठी महिला बचत योजना जाहीर
- महिलांसाठी नवीन बचत योजनेची घोषणा