नवी दिल्ली: मुंबईतील निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून करण्यात आलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संबंधितांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

... हा तर सरकार पुरस्कृत दहशतवाद; देवेंद्र फडणवीसांची महाविकासआघाडीवर टीका


सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र शेअर केल्यामुळे शुक्रवारी ८ ते १० शिवसेना कार्यकर्त्यांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. 



महाराष्ट्रात सरकारचे अत्याचार वाढलेत, केंद्राने हस्तक्षेप करावा- कंगना राणौत 


या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी फोन करून मदन शर्मा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर ट्विट करतान राजनाथ सिंह यांनी म्हटले की, काही गुंडांनी माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. यासंदर्भात अधिकाऱ्याला फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी सैनिकांवर अशाप्रकारे हल्ले होणे ही बाब खेदनजक आणि खपवून घेण्याजोगी नाही, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले. तर बिहारचे निवडणूक प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेचा निषेध केला. फडणवीस यांची शनिवारी पाटणा येथे पत्रकारपरिषद झाली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मदन शर्मा यांना करण्यात आलेली मारहाण म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवादाचा प्रकार असल्याचे वक्तव्य केले.