पाटणा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉटसएपवर फॉरवर्ड केल्यामुळे कथित शिवसैनिकांकडून शुक्रवारी कांदिवली येथे राहणारे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. ही घटना म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाराष्ट्रात सरकारचे अत्याचार वाढलेत, केंद्राने हस्तक्षेप करावा- कंगना राणौत
बिहारचे निवडणूक प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी पाटण्यात पत्रकारपरिषद झाली. त्यावेळी मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, हे अत्यंत अयोग्य असून हा सरकार पुरस्कृत दहशतवादाचा प्रकार आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटच्या माध्यमातून गुंडगिरी थांबवण्यास सांगितली. याप्रकरणात सहा आरोपींना अटक झाली. मात्र, अवघ्या १० मिनिटांत त्यांना जामीन मिळाला, असे फडणवीस यांनी म्हटले. त्यामुळे आता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाबरोबर हा मुद्दाही बिहारच्या निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे.
It's very wrong & kind of 'state-sponsored terror' situation. I called upon Uddhav ji through my tweet to stop goonda raj. 6 accused were released in 10 minutes: Former Maharashtra CM Devendra Fadnavis on retired Navy officer who alleged he was beaten up by Shiv Sena workers pic.twitter.com/OllXoIxzzS
— ANI (@ANI) September 12, 2020
सुशांतला न्याय मिळेपर्यंत भाजप गप्प बसणार नाही - देवेंद्र फडणवीस
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे दोन शाखाप्रमुख आणि सात ते आठ कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा दावा भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता.