HDFC Bank Increase Rate Of Interest On EMI: एचडीएफसी बँक कर्जदारांसाठी वाईट बातमी आहे. जर तुम्ही या बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला जास्तीचं व्याज भरावं लागणार आहे. कारण बँकेनं कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेचा व्याज दर 7 नोव्हेंबर 2022 पासून वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ईएमआयची रक्कम वाढणार आहे. बँकेनं मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (Marginal Cost Lending Rate) वाढवला आहे. एमसीएलआर वाढवल्याने व्याजदरात वाढ झाली आहे. त्यामुळे पर्सनल लोन, ऑटो लोन आणि होम लोनचा ईएमआय वाढणार आहे. 


व्याजदरात किती वाढ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, कर्जावरील एमसीएलआर दर 7.90 टक्क्यांवरून 8.20 टक्के झाला आहे. त्याच वेळी, एक महिन्याच्या मुदतीच्या कर्जाचा दर 8.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. 3 ते 6 महिन्यांच्या कर्जाचा व्याजदरही 8.30 टक्क्यांवरून 8.40 टक्क्यांवर गेला आहे. याशिवाय, एक वर्षाचा MCLR दर देखील 8.55 टक्के झाला आहे. 2 वर्षांच्या कालावधीसाठी दर 8.30 टक्क्यांवरून 8.65 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच 3 वर्षांच्या कर्जावरील एमसीएलआरचा दर 8.75 टक्क्यांवर पोहोचला आहे.


Credit Score, CIBIL Score आणि CIBIL Report मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या


एमसीएलआर म्हणजे काय?


एमसीएलआर ही भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने विकसित केलेली एक पद्धत आहे. या आधारावर बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. त्यापूर्वी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित करत होत्या.