नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार आहे. त्यापूर्वी आणखीनए एका मंत्र्याने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंडारू दत्तात्रेय यांच्याआधी राजीव प्रताप रूडी, उमा भारती, केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान, कलराज मिश्र यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा ३ सप्टेंबर रोजी विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यापूर्वी या मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय.


३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.



तसेच, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेमंत्रीपद दिलं जाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.


बंडारू दत्तात्रेय हे तेलंगानामधील सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे खासदार आहेत. २०१४ साली त्यांनी मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं.