Bank Cheque Rules: बँकेची बरिचशी काम आज ऑनलाईन होतात. अगदी खात्यात पैसे भरणे किंवा पैसे काढणे. असं असलं तरीही चेकबुकचा वापर आजही केला जातो. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आजही कागदपत्र म्हणून चेकचा वापर केला जातो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल चेकच्या व्यवहारादरम्यान त्याच्यामागे स्वाक्षरी केली जाते. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, ही स्वाक्षरी करण्यामागचं कारण काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, स्वाक्षरी फक्त त्या चेकच्या मागील बाजूस केली जाते जी बेअरर चेक असते. तर ऑर्डर चेकच्या मागील बाजूस स्वाक्षरी करणे अनिवार्य नाही. बेअरर चेक हा असा आहे की, जो कोणीही बँकेत नेऊन कॅश करू शकतो. ज्याचे नाव त्यावर लिहिलेले असेल तोच त्या चेकमधून पैसे काढू शकेल, असे नाही. ऑर्डरच्या धनादेशातील पैसे फक्त त्या व्यक्तीला दिले जातात ज्याचे नाव तिथे लिहिलेले असते. त्या व्यक्तीने बँकेत हजर राहणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑर्डर चेकवर स्वाक्षरी आवश्यक नाही. ऑर्डर चेकवर पैसे देण्यापूर्वी बँक कर्मचारी स्वत: संपूर्ण चौकशी करून पैसे देतात. 


बँका स्वतःचे संरक्षण करतात


कोणीही बेअरर चेक घेऊन पैसे काढू शकत असल्याने हा चेक वाटेत कोणी सापडला किंवा चोरला तरी त्याला पैसे दिले जाण्याचा धोका असतो. अशा स्थितीत बँकेवर प्रश्न निर्माण होऊ शकतात. हे टाळण्याचा एक मार्ग म्हणजे धनादेशाच्या मागे सही करून घेणे. पैसे काढण्यासाठी जो कोणी आला असेल त्याची स्वाक्षरी घेऊन, पैसे बँकेने दिले आहेत की नाही याची खात्री केली जाते आणि पैसे चुकीच्या व्यक्तीकडे गेले असले तरी, यामध्ये बँकेची कोणतीही जबाबदारी राहणार नाही.


जर रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर बँक निश्चितपणे रोख जमा करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीकडून पत्ता पुरावा मागते आणि त्यानंतरच पैसे देते. याशिवाय आणखी एक कारण आहे की काही वेळा समोरील सहीबद्दल दुप्पट खात्री होण्यासाठी धनादेशाच्या मागे सह्या घेतल्या जातात. जर कोणी स्वाक्षरी करण्यास नकार दिला तर त्याला रोख रक्कम काढण्यासाठी त्याच्या संपूर्ण माहितीसह एका कागदावर अर्ज करावा लागेल.


स्वाक्षरीची गरज कधी नसते 


वर नमूद केल्याप्रमाणे, ऑर्डरच्या मागील बाजूस किंवा पेयीच्या चेकवर स्वाक्षरी आवश्यक नाही. याशिवाय जेव्हा एखादी व्यक्ती चेकद्वारे स्वतःच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी गेली असेल तेव्हाही बेअरर चेकवर स्वाक्षरी आवश्यक नसते. जेव्हा तिसरा पक्ष दुसऱ्याच्या विनंतीवर बेअररचा चेक काढण्यासाठी येतो तेव्हाच स्वाक्षरी आवश्यक असते.