Bank of India Job: चांगला पगार, सुट्ट्यांमुळे बॅंकेतील नोकरीही अनेकांना हवीहवीशी वाटते. बॅंकेत नोकरी मिळाली की करिअर चांगल चाललंय असं अनेकांना वाटतं. म्हणून काहीजण बॅंकेत नोकरी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकजण वर्षानुवर्षे बॅंक भरती परीक्षांची तयारी करत असतात. अशा सर्वांसाठी एक महत्वाची माहिती आहे. बॅंक ऑफ इंडियामध्ये शेकडो पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा,अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 


शैक्षणिक अर्हता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅंक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदाच्या एकूण 143 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून  बीई/बीटेक, एमसीए, एमएससी, पोस्ट ग्रॅज्युएशन, लॉ पदवी, लॉ पदवी यापैकी अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते  40 वर्षांदरम्यान असावे. 


अर्ज शुल्क


खुल्या गटातील उमेदवारांकडून यासाठी 850 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. तर एससी/एसटी उमेदवारांकडून 175 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल.


अर्जाची शेवटची तारीख


10 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येईल. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज बाद करण्यात येईल, याची उमेदवाराने नोंद घ्यावी.


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


IDFC फर्स्ट बॅंकेत बंपर भरती


आयडीएफसी फर्स्ट बॅंकेत असिस्टंट कस्टमर सर्व्हिस मॅनेजर पदाची भरती केली जाणार आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना ब्रांच मॅनेजिंग ऑपरेशनसाठी रिटेल  बॅंकींग व्यवसाय संभाळावा लागणार आहे. आयडीएफससी फर्स्ट बॅंक शाखेतील नेहमीचे व्यवहार आणि व्यवस्थापकीय जबाबदारी संभाळावी लागेल. बॅंकेची पॉलिसी आणि प्रोसिजरचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. ग्रामीण भागातील डेजिग्रेटेड ब्रांचच्या ग्राया पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पद आणि अनुभवानुसार दरमहा 17 हजार ते 60 हजारपर्यंत पगार मिळू शकतो. हकांना ब्रांच ऑपरेशन आणि सर्व्हिस द्यावी लागणार आहे.