Smartphone मधील `हे` धोकादायक अॅप्स Bank अकाऊंट करतील रिकाम
बँक अकाऊंटच खाली होईल... तुमच्या Smartphone मध्ये `हे` अॅप्स नाहीयेत ना?
मुंबई : देशभरात ऑनलाईन फसवणूकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून या सायबर चोरट्यांना सर्वसामान्यांना गंडा घालता येतो. या चोरीमध्ये कुठेतरी सर्वसामान्य नागरीक देखील जबाबदार आहेत. कारण त्यांच्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) असलेले काही अॅप त्यांच बँक अकाऊंट खाली करत असतात. आणि याबाबत त्यांना माहिती देखील नसते. त्यामुळे असे कोणते अॅप आहेत ज्यामुळे तुमचं बँक अकाऊंट रिकाम होतं, ते जाणून घेऊयात.
हे ही वाचा : पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किम तुम्हाला करतील मालामाल? जाणून घ्या
'ही' चुक पडते महागात?
स्मार्टफोनमध्ये (Smartphone) नकळत आपण अनेक अॅप इन्स्टॉल करत असतो. या अॅपमधून आपली वैयक्तीक माहिती चोरट्यांना मिळत असते. आणि हे चोरटे या माहितीद्वारे सर्वसामान्यांना गंडा घालत असतात. त्यामुळे तुमच्या या एका चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
असा गंडा घालतात
स्मार्टफोनमध्ये (Smartphone) जर असे अॅप्स इन्स्टॉल असतील तर ते तुमचा वैयक्तिक डेटा, बँकेचे तपशील घेतात. मालवेअरने भरलेले हे अँड्रॉइड अॅप्स वापरकर्त्यांचे लॉगिन तपशील, खाते क्रमांक आणि इतर आर्थिक तपशील चोरतात. आणि नंतर ते गंडा घालतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून 5 धोकादायक अॅप्स तात्काळ डिलीट करा. या अॅप्सबद्दल असे सांगण्यात आले आहे की ते वापरकर्त्यांचे बँक खाते रिकामे करू शकतात.
हे ही वाचा : ATM मधून फाटलेल्या नोटा बाहेर आल्यास काय करावे, जाणून घ्या
'हे' 5 अॅप डिलीट करा
- Recover Audio, Images & Videos
- Zetter Authentication
- File Manager Small, Lite
- Codice Fiscale 2022
- My Finances Tracker
जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) वरील हे अॅप्स इन्स्टॉल असतील, तर ते आताच डिलीट करा. अन्यथा तुम्हालाही मोठा फटका बसेल.